’केसरी’शब्दकोडे स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण   

पुणे : ’केसरी’च्या ‘शब्दकोडे’ स्पर्धेतील विजेत्यांना ‘केसरी’च्या विश्वस्त-व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक यांच्या हस्ते मंगळवारी पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. हा सोहळा ‘केसरी’च्या कार्यालयात पार पडला. 
 
ही स्पर्धा बैद्यनाथ आयुर्वेद लिमिटेडने प्रायोजित केली आहे. बैद्यनाथतर्फे विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.स्पर्धा शब्दकोडे ‘केसरी’त दुसर्‍या व चौथ्या गुरूवारी प्रसिद्ध केले जाते. स्पर्धेत वाचकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांचाही सहभाग होता. स्पर्धा शब्दकोडे क्रमांक १ मध्ये दोरेंद्र रमाकांत करंजवकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक बाळकृष्ण विश्वनाथ वाडेकर यांनी, तर प्रभाकर बळीराम कारभारी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. अरूण प्रल्हाद राणे यांनी चतुर्थ क्रमांक, सतीश काळे यांनी पाचवा क्रमांक पटकावला. 
 
स्पर्धा शब्दकोडे क्रमांक २ मध्ये पल्लवी मल्हार जोशी  यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक बाळकृष्ण विश्वनाथ वाडेकर यांनी, तर तृतीय क्रमांक रत्नप्रभा प्रभाकर मंगळकर यांनी मिळविला. सुरजकुमार सुधाकर पाटील यांनी चतुर्थ क्रमांक, स्नेहा श्रीनिवास मादास यांनी पाचवा क्रमांक पटकावला. शब्दकोडे स्पर्धेच्या निमित्ताने मराठी भाषेची उजळणी पुन्हा करता आली, ‘केसरी’चा हा अतिशय चांगला उपक्रम आहे. तसेच, शब्दकोड्याची काठिण्य पातळी चांगली असल्याचे विजेत्या स्पर्धेकांनी यावेळी सांगितले. 

Related Articles