अजित पवार यांच्या निधनाने लोणावळ्यावर शोककळा   

लोणावळा: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रासह लोणावळा शहर दु:खाच्या महापुरात बुडाले आहे. ही हृदयद्रावक बातमी समजताच पर्यटनाची पंढरी मानल्या जाणार्‍या लोणावळ्यात सर्वत्र भीषण स्तब्धता पसरली होती.
 
बुधवारी सकाळी दादांच्या निधनाचे वृत्त वार्‍यासारखे पसरताच शहरवासीयांनी स्वतःहून सर्व व्यवहार बंद ठेवून आपल्या या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली. 
काल दुसर्‍या दिवशी गुरुवारी देखील दादांचे अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. 
 
लोणावळ्याच्या पायाभूत सुविधांपासून ते पर्यटन विकासापर्यंत दादांनी दिलेल्या भरीव योगदानाची आठवण काढताना अनेकांना अश्रू अनावर झाले. 
आता असा कणखर नेता पुन्हा होणे नाही, अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत. एका पर्वाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे.

Related Articles