E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
अजित दादांची 'एक्झिट'
Samruddhi Dhayagude
29 Jan 2026
शेतात कोसळले विमान ; महाराष्ट्रावर शोककळा
विजय चव्हाण
बारामती : कणखर आणि धडाडीचे नेते अशी ओळख असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. या अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला. पवार यांच्या पार्थिवावर आज (गुरुवारी) सकाळी ११ वाजता शासकीय
इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई आशाताई, पत्नी सुनेत्रा पवार, पुत्र पार्थ व जय असा परिवार आहे. विमान दुर्घटनेत वैमानिकासह आणखी चौघांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार पार पडतील. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने सांगितले.पवार यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांसह देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांनी दु:ख व्यक्त केले. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत घटनेची माहिती घेतली.
अजित पवार जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. बारामतीत त्यांच्या चार सभांचे आयोजन करण्यात आले होते. काल सकाळी ८.५० च्या सुमारास विमान अपघात झाला. या घटनेत अजित पवार यांसह त्यांचे मुख्य सुरक्षा रक्षक विदीप जाधव, वैमानिक सुमित कपूर, शांभवी पाठक, विमान कर्मचारी पिंकी माळी यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व असलेल्या दादांच्या अकाली जाण्याने सर्वांनाचा मोठा धक्का बसला आहे. कोणाचाच या बातमीवर विश्वास बसत नव्हता.
विमानतळाजवळील एका शेतात हे विमान कोसळले. अपघातग्रस्त विमान आगीत पूर्णपणे खाक झाले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सकाळी पावणे नऊच्या सुमारास विमानाने विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पहिल्या प्रयत्नात विमान उतरले नाही. दुसर्यांदा प्रयत्न करताना विमान धावपट्टीच्या बाजूला खडकाळ माळरानावर जाऊन आदळले. त्यानंतर मोठा स्फोट झाला. विमानातून दोन व्यक्ती बाहेर फेकल्या गेल्या. सुरुवातीला प्रवासी कोण आहेत हे कळले नव्हते. मात्र, नंतर प्रसिद्धीमाध्यमांद्वारे विमानात अजित पवार असल्याचे सर्वांना समजले. स्फोटानंतर विमानाचे अवशेष दूरवर पडले होते. काहींनी अवशेषांजवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग मोठी होती.
त्यामुळे विमानाच्या जवळ जाता आले नाही. विमान अपघाताची माहिती समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि समर्थकांनी घटनास्थळी गर्दी केली. अपघात नेमका कसा झाला, याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र, तांत्रिक बिघडामुळे हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. विमानामध्ये अजित पवारांसह पाच जण होते. त्यांना तातडीने बारामती येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, अपघात इतका भयानक होता की रुग्णालयात आणण्यापूर्वीच सर्वांचा मृत्यू झाला होता. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सर्व मृतदेह ठेवण्यात आले होते. त्यावेळी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. या ठिकाणी राज्यभरातून आलेल्या नेत्यांनी अजित पवार यांचे अंतिम दर्शन घेतले.
शेवटचे ट्वीट
सकाळी ८ वाजून ५७ मिनिटांनी अजित पवार यांनी ट्वीट केले होते. मात्र, त्यांचे हे ट्वीट अखेरचे ठरेल, असे कोणासही वाटले नव्हते. दादांनी महान स्वातंत्र्य सेनानी लाला लजपत राय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारे ट्वीट केले होते. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे, महान स्वातंत्र्य सेनानी, स्वराज्याचे उद्घोषक, ‘पंजाब केसरी’ लाला लजपत राय जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांची राष्ट्रनिष्ठा आपल्याला कायमच प्रेरणा देत राहील, असे ट्वीट त्यांनी केले होते.
Related
Articles
१५ फेब्रुवारीपासून उच्च सुरक्षा नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कडक कारवाई
12 Feb 2026
व्हॉट्सऍप कट्टा
14 Feb 2026
कर वाढीबाबत पुणेकरांना दिलासा
13 Feb 2026
सत्ता सोडताना युनूस यांंचे भारताविरोधात फुत्कार
18 Feb 2026
पुण्यात तपमानाचा पारा वाढला
18 Feb 2026
राम अक्षर कोरलेली अंगठी टिपू सुलतान घालत असे...
16 Feb 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राष्ट्रगीतापूर्वी आता ‘वंदे मातरम्’ केंद्राची मार्गदर्शक नियमावली जारी
2
मुंबईच्या महापौरपदाची सूत्रे आता रितू तावडे यांच्याकडे
3
व्यापार नव्हे, सापळा करार
4
केंद्राकडून ११४ राफेल विमानांच्या खरेदीला मंजुरी
5
दोन दशकांनंतर बीएनपी पुन्हा सत्तेत
6
आरोग्यं धनसंपदा