E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
दिवसभर ऊन; सकाळी गारवा
Wrutuja pandharpure
21 Jan 2026
पुणे
: गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरातील किमान तपमानात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसभर सर्वत्र ऊन पडत आहे. रात्री काही प्रमाणात उकाडा जाणवत आहे; मात्र पहाटेपासून सकाळपर्यंत हवेत गारवा जाणवत आहे. त्यामुळे दिवसा ऊन आणि सकाळी गारवा असे वातावरण शहरात आहे.
पुढील दोन दिवस शहर आणि परिसरात सकाळी हलके धुके पडणार आहे. दिवसभर आकाश नीरभ्र असणार असून सायंकाळी आकाश अंशत: ढगाळ असणार आहे. येत्या दोन दिवसांत कमाल आणि किमान तपमानात २ ते ३ अंश किमान तपमानाने वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आणखी दोन दिवस पहाटेपासून सकाळपर्यंत हवेत गारवा कायम असणार आहे.
वाढलेल्या तपमानामुळे सायंकाळनंतर शहरात पेटणार्या शेकोट्या विझल्या आहेत, तसेच सकाळी तसेच सायंकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडणार्यांची संख्याही वाढली आहे. तपमानात वाढ झाल्याने दिवसभर कार्यालयात तसेच घरात फॅनचा वापर करावा लागत आहे. शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरातील तपमानातही वाढ झाली आहे. थंडी कमी झाल्यामुळे विविध प्रकारच्या बाजारपेठांमधील व्यवहार सुरळीत झाले आहेत. दरम्यान, राज्यातही ठिकठिकाणच्या तपमानात वाढ झाली आहे. राज्यात काल यवतमाळ येथे नीचांकी ११ अंश किमान तपमानाची नोंद झाली. संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. राज्यातील किमान तपमान सरासरीच्या आसपास होते.
शहरात नोंदले गेलेले तपमान
ठिकाण
कमाल तपमान
किमान तपमान
पाषाण
३१ अंश
१२.३ अंश
शिवाजीनगर
३१ अंश
१२.५ अंश
लोहगाव
३१ अंश
१५.९ अंश
कोरेगाव पार्क
३१ अंश
१६.२ अंश
मगरपट्टा
३० अंश
१७.५ अंश
Related
Articles
चिनाब नदीवरील स्वालाकोट प्रकल्पाची माहिती द्या
14 Feb 2026
कॅनडात शाळेच्या परिसरात गोळीबार; दहा जणांचा मृत्यू
12 Feb 2026
अमेरिकेचे घूमजाव...
12 Feb 2026
बीएसई : या ’दादा’चा हात हातात घ्या!
16 Feb 2026
करिमनगर महापालिकेत भाजपची प्रथमच सत्ता
17 Feb 2026
बांगला देशात आज मतदान
12 Feb 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राष्ट्रगीतापूर्वी आता ‘वंदे मातरम्’ केंद्राची मार्गदर्शक नियमावली जारी
2
मुंबईच्या महापौरपदाची सूत्रे आता रितू तावडे यांच्याकडे
3
व्यापार नव्हे, सापळा करार
4
केंद्राकडून ११४ राफेल विमानांच्या खरेदीला मंजुरी
5
दोन दशकांनंतर बीएनपी पुन्हा सत्तेत
6
आरोग्यं धनसंपदा