E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
आलिशान मोटारीने 16 जणांना चिरडले
Wrutuja pandharpure
10 Jan 2026
जयपूरमध्ये अनेक स्टॉल उडविले; एकाचा मृत्यू
जयपूर
: राजस्तानची राजधानी जयपूर येथे आलिशान मोटारीने 16 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. रस्त्याकडेच्या खाद्यपदार्थाचा स्टॉल होता. तेथे गर्दी होती. त्या गर्दीत मोटार घुसली होती.
जयपूर येथील पत्रकार कॉलनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खारबास सर्कल परिसरात रस्त्याकडे उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थाच्या स्टॉल परिसरात हा अपघात शुक्रवारी रात्री झाला. आलिशान मोटार ही दुसर्या एका मोटारीसोबत स्पर्धा करत होती. एका क्षणी ती दुभाजकाला धडकली आणि नंतर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ती खाद्यपदार्थाच्या स्टॉलमध्ये घुसली. तेव्हा 50 हून अधिक नागरिक तेथे होते. एकूण 10 स्टॉलला मोटारीने धडक दिली होती. 16 नागरिकांना मोटारीने चिरडले. नंतर ती 100 मीटरवरील एका झाडाला धडकून थांबली..यानंतर ती उलटली होती. 16 पैकी चार जखमींना जयपुरीया रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी तिघांना उपचारानंतर घरी सोडले, अशी माहिती पोलिस अधिक़ारी मदन कडवसरा यांनी दिली.
दिनेश रिनवा, असे मोटारचालकाचे नाव आहे. तो उद्योगपती असून त्याच्यासेबत अन्य दोन जण मोटारीत होते. तिघेही अपघातानंतर घटनास्थळावरुन पळून गेले होते. त्यापैकी एकाला स्थानिक नागरिकांनी पकडले तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत सापडला. मोटार आणि त्याचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अत्यंत दुदैवी घटना अशा शब्दात दु:ख व्यक्त केले. जखमींवर उपचार करण्याचे आदेश दिले. आरोग्य मंत्री गजेंद्र सिंह खिमसार यांनी जखमींची विचारपूस केली. डॉक्टर आणि कर्मचार्यांना जखमींची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
Related
Articles
देवाची इच्छा असेल तर आमचा महापौर होईल
18 Jan 2026
मतदानासाठी पीएमपीएमएलच्या १ हजार ५६ बसेस
13 Jan 2026
महापालिका निवडणुकीत पैसे वाटपाचा आरोप
14 Jan 2026
पाकिस्तानात गोळी घालून हिंदू शेतकर्याची हत्या
12 Jan 2026
महापालिका निवडणुकीत राजकीय भूकंप !
16 Jan 2026
श्वान चावल्यास जबाबदार कोण; राज्ये मोठी भरपाई देणार का?
14 Jan 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
रामाला शाप आणि सुग्रीवाचा राज्याभिषेक
2
‘शंख एअरलाईन्स’ हवाई सेवेत
3
ट्रम्प यांची गोबेल्सनिती (अग्रलेख)
4
व्हॉट्सऍप कट्टा
5
वाचक लिहितात
6
विराट-रोहितचा खास सन्मान