ममता उतरल्या रस्त्यावर   

ईडीच्या कारवाईविरोधात कोलकात्यामध्ये निषेध मोर्चा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्याच्यानिमित्ताने तृणमूल काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवून दिली.
 
मागील काही दिवसांपासून ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारबरोबर संघर्ष वाढला आहे. मध्यंतरी, विशेष मतदार यादी सुधारणा (एसआयआर) मोहिमेविरुद्ध ममता रस्त्यावर उतरल्या होत्या. आता ‘आय-पॅक’वरील ईडी कारवाईविरोधात ममता यांनी केंद्र सरकारविरोधात मोठी आघाडी उघडली आहे.ममता यांनी स्वतः मोर्चाचे नेतृत्व केले. या मोर्चामध्ये तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles