E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू
Wrutuja pandharpure
10 Jan 2026
अमेरिकेच्या धमकीला भारताचे उत्तर
पुणे
: अमेरिकेने भारताला पुन्हा एकदा आयात शुल्काचा इशारा दिला आहे. त्यास भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. कुणाच्या दबावाखाली भारत आपले ऊर्जा धोरण बदलणार नाही. आम्ही आमच्या १४० कोटी जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी स्वस्त इंधनाचे स्रोत शोधत राहू, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.
रशियाकडून स्वस्त दरात खनिज तेल खरेदी करणार्या भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांवर तब्बल ५०० टक्के टॅरिफ लादण्याच्या प्रस्तावाला ट्रम्प यांनी नुकताच हिरवा कंदील दाखवला. भारत सरकार अमेरिकेच्या ‘सँक्शनिंग रशिया अॅक्ट २०२५ ’वर लक्ष ठेवून आहे, असे जयस्वाल म्हणाले. आमचे इंधनाच्या खरेदीसाठीचे धोरण पूर्णपणे स्पष्ट आहे. तसेच, आम्ही जागतिक बाजारातील चढऊतार आणि आपल्या गरजांच्या हिशेबाने निर्णय घेतो.
भारत कुठल्याही देशाकडून तेल खरेदी करण्यासाठी स्वतंत्र आहे. तसेच, स्वस्त ऊर्जेच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षितलेला सुनिश्चित करण्याला आमचे प्राधान्य आहे.भारत आपल्या ऊर्जेच्या गरजेसाठी जगभरातील बाजारांचा आढावा घेत आहे. आम्ही १४० कोटी लोकांच्या ऊर्जेच्या गरजेसोबत तडजोड करू शकत नाही, असेही ते म्हणाले.रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्याच्या नावाखाली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क धोरण आणल्याचे सांगत आहेत. व्यापार करार हाही एक त्याचाच भाग आहे.
Related
Articles
रशियाने युक्रेनसोबत युद्ध लांबविले
14 Jan 2026
निपाह संसर्गाची झारखंडला भीती
16 Jan 2026
राजस्तानच्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात पाणीच पाणी
13 Jan 2026
कमी वयाच्या नगरसेवकांचा महानगरपालिकेत दमदार प्रवेश
18 Jan 2026
सरहद्दीवरील प्रदेशात शैक्षणिक कार्याची आवश्यकता
18 Jan 2026
पाकिस्तानात आठ दहशतवादी तळ सक्रिय
13 Jan 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
रामाला शाप आणि सुग्रीवाचा राज्याभिषेक
2
ट्रम्प यांची गोबेल्सनिती (अग्रलेख)
3
‘शंख एअरलाईन्स’ हवाई सेवेत
4
व्हॉट्सऍप कट्टा
5
वाचक लिहितात
6
इस्रोचे रॉकेट भरकटले