E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
हिमाचलमध्ये खासगी बस दरीत कोसळली
Samruddhi Dhayagude
10 Jan 2026
नऊ ठार; ४० जखमी
सिमला : हिमाचल प्रदेशाच्या सिरमौर जिल्ह्यात शुक्रवारी प्रवाशांनी भरलेली खासगी बस ५०० फूट दरीत कोसळली. या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. तर, पाच जण जखमी आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ही दुर्घटना हरिपूरधार परिसरात घडली. अपघातग्रस्त खासगी बस सोलनहून येत होती. ती सिमल्याहून राजगडमार्गे कुपवीकडे निघाली होती. हरिपुरधारजवळ चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस ५०० फूट दरीत कोसळली. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी आहेत, अशी माहिती संगराहचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) सुनील कायथ यांनी दिली. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून जखमींना संगराह आणि दादहू रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. जिल्हा प्रशासनाला मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आणि जखमींवर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले. या घटनेनंतरची चित्रफित समाज माध्यमावर फिरत आहे. यामध्ये बचावकार्यात अनेक जण गुंतल्याचे दिसत आहे. तसेच, ते जखमींना बाहेर काढताना अथक परिश्रम करताना पाहायला मिळत आहे.
Related
Articles
महायुती ठरली सरस (अग्रलेख)
17 Jan 2026
महापालिका निवडणुकीत पैसे वाटपाचा आरोप
14 Jan 2026
परभणीत उद्धव सेनेने महायुतीचा विजयी रथ रोखला
16 Jan 2026
जीडीपी उच्चांकी, महागाई नीचांकी
14 Jan 2026
आव्याच्या ’राखेतून’ उलगडले ’सौभाग्याचे’ स्वप्न
15 Jan 2026
महापालिका निवडणुकीत 19 प्रभागात क्रॉस वोटिंग
18 Jan 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
रामाला शाप आणि सुग्रीवाचा राज्याभिषेक
2
‘शंख एअरलाईन्स’ हवाई सेवेत
3
ट्रम्प यांची गोबेल्सनिती (अग्रलेख)
4
व्हॉट्सऍप कट्टा
5
वाचक लिहितात
6
विराट-रोहितचा खास सन्मान