२६ हजार कर्मचार्‍यांची नियुक्ती; चार हजार पोलिसांचा बंदोबस्त   

महापालिका निवडणूक 

पुणे : पुणे महापालिका निवडणूकीसाठी २६ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी ४ हजार १०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, पुण्यात ९०६ संवेदनशील मतदानकेंद्र निश्चित करण्यात आली असून याठिकाणी कडेकोठ बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.महापालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त प्रसाद काटकर, रवि पवार, तुषार बाबर आदी उपस्थित होते. 
 
पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकुण नियुक्त क्षेत्रीय अधिकारी संख्या ४५४ आहे. १४ हजार ५०० मतदान यंत्र (बॅलेट युनिट), तर ५ हजार ५०० कंट्रोल युनिट आहेत. या निवडणुकीसाठी १७२ पथके स्थापन करण्यात आली आहेत.महापालिका निवडणुकीत सुमारे १२ हजार टपाली मतपत्रिका करिता मागणी नोंदविली असुन त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे. महापालिका निवडणुकीसाठी १४ हजार ५०० मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आहेत. त्यापैकी काही मतदानयंत्रांमध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधीसमोर मतपत्रिका सील करण्यास काही ठिकाणी सुरुवात झाली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये महिला मतदान केंद्र आणि प्रत्येक प्रभागामध्ये आदर्श मतदान केंद्र प्रत्येकी दोन केंद्र असणार आहेत, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
 
मतमोजणीसाठी १ हजार १०० कर्मचारी
 
महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी १६ जानेवारी रोजी होणार आहे. मतमोजणीसाठी १ हजार १०० कर्मचारी नेमले आहेत.
 
मतदानांच्या दिवशी ४५ रूग्णवाहिका
 
महापालिका निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे रूग्णवाहिकेसहित १५ वैद्यकीय पथक उपलब्ध करून देण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी पालिकेच्या १५ रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आले आहे. १५ क्षेत्रिय कार्यालयाकडे बुथनिहाय स्टाफ, नर्स आणि आशा कार्यकत्याची नेमणूक करण्यात आली आहे.
 
निवडणूक निर्णय अधिकारी १५
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ३५
आचारसंहिता पथके ६५
क्षेत्रिय अधिकारी ३३८

Related Articles