E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
सोन्याच्या विक्रीत घट
Wrutuja pandharpure
10 Jan 2026
वृत्तवेध
सोन्याचे भाव सातत्याने विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. त्यामुळे लग्नाच्या हंगामातील खरेदीवर नकारात्मक परिणाम होत आहे. असे असूनही जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मिळालेल्या जोरदार ऑर्डरमुळे नवीन वर्षात विक्री पुन्हा वाढेल अशी ज्वेलर्सना आशा आहे. ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या २०२५ च्या तिमाही अहवालानुसार, भारतातील सोन्याची एकूण मागणी गेल्या वर्षीच्या २४८.३ टनांच्या तुलनेत सुमारे १६ टक्क्यांनी घटून २०९.४ टन झाली आहे. विक्रमी किमतींमुळे दागिन्यांची मागणीही गेल्या वर्षीच्या तुलनेत ३१ टक्क्यांनी घटली आहे.
सध्या बाजारपेठेतील २० टक्क्यांहून अधिक ऑर्डर लग्नांशी संबंधित असल्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये चांगली सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. या लग्नाच्या हंगामात विक्री दहा टक्क्यांहून अधिक होण्याची अपेक्षा असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे. ज्वेलर्सचे म्हणणे आहे की, सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य ग्राहकांना खरेदीपासून पूर्णपणे रोखले गेले नसले तरी त्याचा मागणीवर परिणाम झाला आहे. सोन्याच्या वाढत्या किमती लोकांना इतर प्रकारचे दागिने खरेदी करण्यास प्रवृत्त करत आहेत. त्यात हिर्याच्या दागिन्यांचा पर्यायदेखील समाविष्ट आहे. ग्राहक मौल्यवान खडे आणि लेब्रोन हिर्यांकडे वळत आहेत. त्याचप्रमाणे खरेदीदार हलक्या आणि आधुनिक डिझाइनच्या दागिन्यांना प्राधान्य देऊ लागले आहेत. हलक्या दागिन्यांसह लग्नासाठी जुने दागिने नवीन दागिन्यांमध्ये बदलले जात आहेत.
सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. मात्र महानगरांमध्ये सोन्याला मागणी मंदावली असली तरी लहान शहरांमध्ये, विशेषतः टियर २ आणि ३ शहरांमध्ये दागिन्यांना मागणी मोठी आहे. या शहरांमध्ये लग्नांच्या संख्येतही वाढ होत असून ती गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. याचे कारण म्हणजे लोक अनेकदा वडिलोपार्जित घरात लग्न करतात. दुसरे कारण म्हणजे महानगरांच्या तुलनेत लहान गावांमध्ये लग्नाचा खर्च कमी असतो. परिणामस्वरूप छत्रपती संभाजीनगर, सातारा, जळगाव आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत दहा टक्के वाढ होत आहे.
Related
Articles
कठुआमध्ये चकमक
14 Jan 2026
लोकमान्य टिळक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेसच्या विद्यार्थिनीचे संशोधन राज्यस्तरावर
14 Jan 2026
महाराष्ट्रातील 'या' शहरात सर्वाधिक नव मतदार
14 Jan 2026
अजित पवारांनी केलेल्या आरोपांची उत्तरे भाजप का देत नाही?
13 Jan 2026
मुंबईसाठी निकराची लढाई... कोण जिंकणार, कोण संपणार?
13 Jan 2026
इंदापुरात ग्रामीण राजकारणाचा ‘महामुकाबला’
16 Jan 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
इराणमधील आंदोलन चिरडण्यास सुरुवात
2
रामाला शाप आणि सुग्रीवाचा राज्याभिषेक
3
‘शंख एअरलाईन्स’ हवाई सेवेत
4
ट्रम्प यांची गोबेल्सनिती (अग्रलेख)
5
इराणचा इतिहास क्रांतीने भरलेला
6
ओडिशात छोटे विमान कोसळून सहा जखमी