पुणे : गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि परिसरातील किमान तपमानात घट होत आहे. तपमानात घटल्यामुळे हवेत गारवा पसरत असून थंडीत वाढ झाली आहे. शहरात गुरूवारी ९.५ अंश किमान तपमानाची नोंद झाली. थंडी वाढल्यामुळे पुन्हा एकदा शहरात शेकोट्या पेटल्या आहेत. शहरातील किमान तपमानात सातत्याने घट होत आहे. विशेषत: रात्रीच्या तपमानात अधिकची घट झाल्याने रात्री सुरू झालेली थंडी सकाळपर्यंत कायम रहात आहे. वाढलेल्या थंडीमुळे सकाळी तसेच सायंकाळी घराबाहेर पडणार्या नागरिकांच्या संख्येत घट झाली आहे. सकाळी फिरायला जाणार्या नागरिकांना गरम कपड्यांचा वापर करावा लागत आहे. घटलेली थंडी आणखी दोन ते तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. शहर आणि परिसरात आणखी दोन दिवस सकाळी धुके पडणार आहे. त्यानंतर मात्र धुके कमी होणार आहे. दिवसभर आकाश मुख्यत: नीरभ्र असणार आहे.
Fans
Followers