अक्षय खन्नाच्या 'धुरंधर' चित्रपटातील FA9LA व्हायरल गाण्याचा अर्थ माहित आहे का?   

बॉलिवूडमध्ये पूर्वीपासूनच त्यातील गाणी आणि संवाद लोकप्रिय झाले तर चित्रपट सुपरहिट होतोच अशी धारणा आहे. हल्ली बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये परदेशी भाषांमधील गाणी वापरण्याचा ट्रेंड येत आहे. जसे की, ऍनिमल चित्रपटातील जमाल कडू' हे गीत. त्यामुळे ही गाणी ज्या चित्रपटांमध्ये वापरली जातात, ती तेवढ्यापुरती मर्यादित राहत नाहीत. सध्या ऍनिमल नंतर आणखी एक गीत रिल्समध्ये जबरदस्त लोकप्रिय होत आहे.  
 
'धुरंधर' चित्रपटात वापरलेले FA9LA हे एक अरबी हिप-हॉप गाणे. आज प्रत्येकाच्या प्ले लिस्टमध्ये आहे. या पूर्वी 'ॲनिमल' चित्रपटातील 'जमाल कुडू' प्रमाणेच, FA9LA ने स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण केली. इंस्टाग्राम रील्सपासून ते यूट्यूब शॉर्ट्सपर्यंत, हे गाणे पॉप-कल्चरमध्ये एक व्हायरल झाले आहे. 
 
भारत आणि जगभरात लोक ज्या आकर्षक हुकवर गात आहेत, त्यातील बऱ्याच जणांना या अरबी गीतांचा नेमका अर्थ काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. धुरंधर मधील या 'सिग्नेचर' गाण्याचा अर्थ उलगडण्यापूर्वी, आदित्य धर दिग्दर्शित यांनी 'धुरंधर' चित्रपटाचा FA9LA हे गीत चित्रपटाचा भाग कसा बनले, हे जाणून घेऊया.

FA9LA 'धुरंधर'चा भाग कसे बनले?

FA9LA हे मूळतः बहरीनी हिप-हॉप गाणे आहे, जे फ्लिपेराची आणि डॅफी यांनी लिहिले आणि गायले आहे, तर डीजे आउटलॉने त्याचे संगीत दिले आहे. 'धुरंधर'च्या निर्मात्यांनी हे गाणे शोधण्यापूर्वीच ते अस्तित्वात होते.
 
फीव्हर एफएमच्या आरजे अवनीला दिलेल्या मुलाखतीत, फ्लिपेराचीने सांगितले की, चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधला होता. तो म्हणाला, "त्यांनी आमच्याशी आधी संपर्क साधला. ते म्हणाले की, त्यांना गाण्यासाठी परवान्याची गरज आहे. त्यांना बीट हवा होता कारण ते स्वतःची आवृत्ती तयार करण्याचा विचार करत होते."
 
कमी वेळ असल्याने नियोजन थोडे बदलावे लागले. गायक पुढे म्हणाला, "वेळेच्या कमतरतेमुळे, ते म्हणाले, 'तुम्हाला माहित आहे का, गाणे पहिल्यापासूनच खूप चांगले आहे. चला ते असेच ठेवूया.' हा निर्णय महत्त्वाचा ठरला. गाणे त्याच्या मूळ अरबी स्वरूपात ठेवल्यामुळे, FA9LA ने आपली मूळ ओळख टिकवून ठेवली, ज्यामुळे ते नंतर व्हायरल होण्यास मदत झाली.

 

FA9LA गीतांचा नेमका अर्थ
 
जरी हे गाणे 'धुरंधर' चित्रपटातील एका प्रसंगात वापरले असले तरी, FA9LA हे मूळ गीत हिंसक किंवा आक्रमक नाही. मूळतः ते उत्सव, नृत्य आणि त्या क्षणाचा आनंद घेण्याबद्दल आहे. सर्वात लोकप्रिय ओळींचा खरा अर्थ पुढे दिला आहे :
 
"या अखि दुस दुस 'इंदी खोश फस्लाह/या अखि तफुझ तफुझ वल्लाह खोश रक्सह" (ब्रो, दिलखुलास नृत्य कर माझ्याकडे एक अप्रतिम बीट ड्रॉप आहे! ब्रो, तू जिंकशील, तू जिंकशील, मी शपथ घेऊन सांगतो, हा एक उत्तम डान्स आहे!)
 
"हेलू-हेलू झैन मकानह हेलू/इल-डेकोरेशन मलाह हेलू" (किती गोड, किती सुंदर आहे ही जागा. इथली सजावटही खूप छान आहे.)
 
"स्वीली रक्सेत इल-मार्शमेलो/रबि'ना हाफौह किलाह कामिल किल्लोह" (माझ्यासाठी मार्शमेलो डान्स कर. आमच्या देवाने सर्व काही परिपूर्ण केले आहे.)
 
"रफीजक तायेह जेतफाह कान येहिज्झाह हिज्झ/याई मिन जमान अव्वल लैल" (तुझा मित्र हरवला आहे, त्याचे खांदे थरथरत आहेत. खूप पूर्वीपासून, अगदी पहिल्या रात्रीपासून.)
 
"अम्बे शफीह 'अब्बूदी योधाह/लाना इहना शायलीन हल-लैलाह याबा शील" (अरे, बघ, अब्बूदी हाक मारत आहे! आम्ही ही रात्र पुढे नेत आहोत - चला, जाऊया!)
 
"अतूल अ'तिनी रक्सा तिग्ली सरने/अतूल अ'तिनी रक्सा अकेल मेटे" (मी म्हणतो, माझ्यासाठी नाच - त्याने मला आनंद होतो! मी म्हणतो, माझ्यासाठी नाच - मिठाई खा!)
 
"अतूल स्वीली रक्सा, हॅलो गुडबाय!/झैदली शकर वायद व अना अशरब शाय" (मी म्हणतो, माझ्यासाठी नाच, हॅलो आणि गुडबाय! मी चहा पीताना भरपूर साखर घाल!)
 
"FA9LA" म्हणजे काय ?
 
फ्लिपेराचीने हे देखील स्पष्ट केले की 'फासला' असा उच्चारल्या जाणाऱ्या FA9LA चा अर्थ शब्दशः नसून तो एका भावनेशी संबंधित आहे."FA9LA म्हणजे एक प्रकारची 'वाईब'. जेव्हा मी म्हणतो 'मला एक FA9LA मिळाला आहे', तेव्हा याचा अर्थ असा होतो की सध्या माझ्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे. हे गाणे वेगवेगळ्या नृत्यांबद्दल आहे. मी प्रत्येक गोष्टीला नृत्यात, एका क्षणात बदलतो," असे तो म्हणाला. त्याने असेही सांगितले की, या गाण्यात अनेक खेळकर सांस्कृतिक संदर्भ आहेत. त्याच्याच शब्दांत सांगायचे तर, "मी प्रत्येक गोष्टीतून एक नृत्य तयार करतो." 
 
FA9LA गाण्याला मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेमुळे, फ्लिपरचीने परम आणि सियाहीसारख्या भारतीय कलाकारांशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. त्याने रॅपर बादशाहसोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे आणि पंजाबी संगीत क्षेत्राबाबत बोलताना  "एक जबरदस्त क्रेझ" म्हटले आहे.
 
त्याने हे देखील सांगितले की, त्याचे स्टेज नाव अमेरिकन रॅपर 'बस्टा राइम्स'च्या 'फ्लिपमोड स्क्वॉड'वरून आले आहे, लहानपणापासून त्याच्यापासून मी प्रेरणा घेतली आणि हळूहळू हळूहळू त्यातूनच 'फ्लिपरची' हे नाव तयार झाले.

 

Related Articles