E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
‘सुरसुंदरी’ (मंदिरांच्या बाह्यभिंतीवरील स्त्री शिल्पे) असण्यामागील संकल्पना उलगडणार
Wrutuja pandharpure
02 Dec 2025
डॉ. गो. बं. देगलूरकर यांचा मास्टर क्लास
पुणे
, 2 डिसेंबर : पुण्यातील इंडी हेरीटेज व परिमल अँड प्रमोद चौधरी फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात येणार्या ‘मास्टर क्लास’ उपक्रमांतर्गत मूर्तिशास्त्र विषयावरील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे ‘सुरसुंदरी’ (मंदिरांच्या बाह्यभिंतीवरील स्त्री शिल्पे) या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सदर मास्टर क्लास शनिवार, दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी रोजी सकाळी 10:30 वाजता भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथील नवलमल फिरोदिया सभागृह येथे होणार असून यामध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्यात मंदिराच्या बाह्यांगावर शिल्पित केलेल्या सुरसुंदरींच्या असण्यामागील संकल्पना उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या व्याख्यानाच्या माध्यामातून केला जाईल.
आपले गुरु डॉ. शां. भा. देव यांच्या सूचनेनुसार डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी सुरसुंदरी या विषयावर संशोधन केले व महाराष्ट्रातील मंदिरे व मूर्तीकला यासंबंधात एक महत्वाचा परंतु तुलनेने दुर्लक्षित अशा विषयाला जगासमोर आणले. आपल्या संशोधनाच्या माध्यमातून डॉ. देगलूरकरांनी सूरसुंदरींची नावानिशी ओळख पटवली. तसेच, मंदिरावरील त्यांच्या शिल्पांकनाचे प्रयोजन काय असू शकेल यावर देखील प्रकाश टाकला.
Related
Articles
असा आहे मुनीर यांचा प्रवास
06 Dec 2025
शरद पवार यांनी दिलेल्या महिला आरक्षणाच्या संधीचे सोने करा
09 Dec 2025
कष्टकर्यांचा आधारवड
10 Dec 2025
बस चालवताना तंबाखू, गुटखा खाल्ल्यास कारवाई
08 Dec 2025
दहा टक्के संख्याबळाची अट अधिनियमात नाही
09 Dec 2025
जातीचे दाखले देण्याची प्रक्रिया वर्षभर सुरू ठेवा : आमदार तांबे
11 Dec 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सूरांच्या मैफलीतून उघडतोय श्रोत्यांच्या भावनांचा कप्पा
2
शीतल तेजवानीच्या घरांची झडती
3
पोरकेपणाची व्यथा (ऑर्फन)
4
जबाबदारीचे भान हवे!
5
महामार्ग, की अपघाताचे सापळे? (अग्रलेख)
6
विमान प्रवाशांची आर्थिक लूट