E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पिंपळे सौदागरमध्ये हॉटेलच्या वरच्या मजल्यास आग
Wrutuja pandharpure
02 Dec 2025
पिंपरी
: पिंपळे सौदागर मधील स्टार बाजार च्या बाजूला असलेल्या हॉटेल रंगला पंजाबच्या वरच्या मजल्यास आग लागली. या ठिकाणी कोचिंग क्लास चालवला जातो. क्लास मधील ४२ विद्यार्थ्यांना तसेच टेरेसवर घाबरून पळालेल्या पाच जणांना अग्निशामक दलाच्या जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढले.
सोमवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास अग्निशामक दलाला या आगीची वर्दी मिळाली. अग्निशामक दलाच्या चार गाड्या व ४० कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. उप अग्निशामक अधिकारी गौतम इंगवले, प्रभारी सब ऑफिसर विनायक नाळे, उप अग्निशामक अधिकारी निशिकांत चिपाडे, चार वाहन चालक आणि ४० कर्मचार्यांनी तासाभरात ही आग आटोक्यात आणली. व्हेंटिलेशन नसल्याने व जागा अपुरी असल्याने ऑक्सिजन सिलेंडर घालून अग्निशामक दलाच्या जवानांनी काम केले. हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर शेड मारून कोचिंग क्लास चालवला जात असल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकार्यांनी सांगितले. आगीत अडकलेल्या बेचाळीस विद्यार्थ्यांना अग्निशामक दलाच्या जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढले.
Related
Articles
मुग्धा- प्रथमेश जोडीची ’मर्मबंधातली ठेव’ मोरयाभक्तांच्या हृदयाच्या मखमली पेटीत जतन
09 Dec 2025
वाहतूक न थांबवता १६० रेल्वे स्थानकांची फेरबांधणी पूर्ण : वैष्णव
11 Dec 2025
सर्वाधिक सौर कृषी पंप बसवून महावितरणचा विक्रम
10 Dec 2025
रात्रीचा पाणीपुरवठा बंद करा
10 Dec 2025
जपानला पुन्हा भूकंपाच्या धक्का
12 Dec 2025
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पालिका निवडणूक तयारीस वेग
07 Dec 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सूरांच्या मैफलीतून उघडतोय श्रोत्यांच्या भावनांचा कप्पा
2
शीतल तेजवानीच्या घरांची झडती
3
पोरकेपणाची व्यथा (ऑर्फन)
4
जबाबदारीचे भान हवे!
5
महामार्ग, की अपघाताचे सापळे? (अग्रलेख)
6
विमान प्रवाशांची आर्थिक लूट