महायुतीतून जागा मिळाव्यात म्हणून याचना करावी लागते   

रामदास आठवले यांनी व्यक्त केली खंत

पिंपरी : महायुतीतून जागा मिळाव्या म्हणून आपल्याला भीक मागावी लागते, अशी खंत  आरपीआय  आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित सभेत यासंदर्भात बोलताना आरपीआय गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्याच पक्षावर नाराजी व्यक्त केली.  ते म्हणाले की शिवसेना,भाजप आणि राष्ट्रवादी हे राज्यात एकत्र आहेत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. आपापल्या कार्यकर्त्याला निवडून आणण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.
 
निवडणुका आल्या की सगळे पक्ष सर्व जागा लढण्याच्या तयारीत असतात, परंतु आमच्या पक्षात अजिबात तसं नाही , जागांसाठी इतर पक्षांकडे भीक मागावी लागते, आपल्याला कुठे जागा सुटल्या आहेत हेही माहीत नसते. यामुळे मी प्रचाराला कुठेच गेलो नाही असं विधान करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.महापालिका निवडणुकीत भाजपने आपल्याला जागा न सोडल्यास महायुती मधील राष्ट्रवादी किंवा शिवसेना यांच्या सोबत युती करण्याचे संकेत त्यांनी दिले. मित्र पक्षाशी युती करून दहा बारा जागांवर आपली तयारी असली पाहिजे असे आठवले म्हणाले.  

Related Articles