E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
राज्यपाल आचार्य देवव्रत यांची आळंदी मंदिरास भेट
Wrutuja pandharpure
02 Dec 2025
आळंदी
(वार्ताहर): येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सद्दिच्छा भेट दिली. गीता जयंती निमित्त वेदश्री तपोवन येथे एका कार्यक्रमा निमित्त ते आळंदी समीप आले होते. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या सद्दिच्छा भेटीत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शन घेतले.राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी समाधी समोर पूजा करीत मनोभावे श्रींचे दर्शन घेतले. या प्रसंगी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त राजेंद्रजी उमाप, आळंदीतील राष्ट्रीय युवा कीर्तनकार विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, विश्वस्त ड. रोहिणीताई पवार उपस्थित होते. यावेळी देवस्थान तर्फे त्यांनी स्वागत करीत संवाद साधून देवस्थान चे कामकाजाची माहिती दिली.
आळंदीत पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरु असून या दरम्यान प्रचाराचा शेवटचा दिवस आणि राज्यपाल यांची आळंदी मंदिरास सद्दिच्छा भेट तसेच एकादशी असल्याने मंदिर परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान आळंदीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश कुर्हाडे यांचेसह नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे प्रचारार्थ सभा झाली. सभा झाल्यावर त्यांनी मंदिरात न जाता श्रींचे महाद्वारातून दर्शन घेत पुढील प्रचार दौर्यास जाणे पसंत केले.
Related
Articles
रात्रीचा पाणीपुरवठा बंद करा
10 Dec 2025
थायलंडचे कंबोडियावर हवाई हल्ले
09 Dec 2025
पुणे विद्यापीठात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मोफत वर्ग
08 Dec 2025
वाचक लिहितात
06 Dec 2025
साडेसहा लाख शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित
12 Dec 2025
केन्स टेक्नॉलॉजी : वाढीच्या शिखरावरचे प्रश्नचिन्ह
08 Dec 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सूरांच्या मैफलीतून उघडतोय श्रोत्यांच्या भावनांचा कप्पा
2
शीतल तेजवानीच्या घरांची झडती
3
पोरकेपणाची व्यथा (ऑर्फन)
4
जबाबदारीचे भान हवे!
5
महामार्ग, की अपघाताचे सापळे? (अग्रलेख)
6
विमान प्रवाशांची आर्थिक लूट