E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
श्रीरामपुरात ८९ केंद्रांवर आज मतदान
Wrutuja pandharpure
02 Dec 2025
श्रीरामपूर
, (वार्ताहर) : श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीचे मतदान पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतदान अधिकार्यांसह ८९ मतदान केंद्रावर मतदान पथके रवाना करण्यात आले आहेत.
आज (मंगळवार दिनांक २ डिसेंबर) श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुक प्रक्रिया पार पडत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद वाघ, मच्छिंद्र घोलप आदींसह सर्व अधिकारी कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडीत आहे. शहरात ८९ मतदान केंद्र असून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्षसह एक पोलिस व इतर सहायक असे कर्मचारी तर इतर राखीव असे सुमारे ५०० कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. ८९ मतदान केंद्रावर ८० हजार ९९२ मतदार हक्क बजावणार असून त्यामध्ये पुरुष मतदार संख्या ३९ हजार ९३६ महिला मतदार संख्या ४१ हजार ७०० तर इतर मतदार संख्या ५६ आहे. प्रत्येक मतदाराला तीन मते देण्याचा अधिकार असल्याने मतदानाला वेळ लागणार आहे.
१ डिसेंबर रोजी मतदान पथके मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. मतदान साहित्य वाटप व जमा करण्यासाठी १७ टेबलचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक टेबलवर मतदान केंद्रांचे साहित्य वाटप करण्यात आल्याने विना गोंधळात साहित्य वाटप प्रक्रिया पार पडली. जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यंत कमी वेळेत साहित्य देवघेव प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व मतदान केंद्रावर देखरेख करण्यासाठी क्षेत्रिय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. ८९ मतदान केंद्रावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
प्रभाग ३ अ ची निवडणूक स्थगित
प्रभाग तीन अ हा अनुसूचित जाती (महिला) राखीव आहे. या मतदारसंघात अनिता ढोकणे यांच्या जात वैधता प्रमाणपत्र बाबत प्रतिस्पर्धी उमेदवार एडके यांनी आक्षेप घेतला होता. त्याबाबत आयोगाने या जागेवरील निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले असून या जागेवर २० डिसेंबर रोजी मतदान आणि २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
मतमोजणीसाठी १७ टेबल
१७ प्रभागासाठी ३४ नगरसेवक तर १ नगराध्यक्ष असे प्रतिनिधी निवडून द्यायचे आहे. मतमोजणीसाठी १७ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात चार ते पाच मतदान केंद्र आहेत. त्यामुळे एकाचवेळी १७ टेबलवर १७ प्रभागांची मतमोजणी सुरू राहील. जास्तीत जास्त पाच फेर्यांपर्यंत मतमोजणी चालेल. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
Related
Articles
सिंहगड रस्त्यावरील मेट्रो प्रकल्प पर्यायी जागेतून राबवावा
08 Dec 2025
शेअर बाजाराची उसळी
06 Dec 2025
होपचे अर्धशतक हुकले
11 Dec 2025
अमेरिकेने एच-१ बी व्हिसाच्या मुलाखती थांबविल्या
11 Dec 2025
आशिया चषकासाठी आयुष म्हात्रेकडे भारतीय संघाचे नेतृत्व
12 Dec 2025
ज्येष्ठ पत्रकार सुरेश जकाते यांचे निधन
06 Dec 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सूरांच्या मैफलीतून उघडतोय श्रोत्यांच्या भावनांचा कप्पा
2
शीतल तेजवानीच्या घरांची झडती
3
पोरकेपणाची व्यथा (ऑर्फन)
4
जबाबदारीचे भान हवे!
5
महामार्ग, की अपघाताचे सापळे? (अग्रलेख)
6
विमान प्रवाशांची आर्थिक लूट