E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
जामखेडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला
Wrutuja pandharpure
02 Dec 2025
जामखेड
(वार्ताहर) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शिवसेनेच्या ठाकरे गटाने ‘एमआयडीसी अडविणार्या सरकारचा निषेध’, ‘शेतकरी कर्जमाफी व कांद्याला हमीभाव द्या’ अशी घोषणाबाजी केल्यामुळे पोलिस प्रशासनाने काही पदाधिकार्यांना ताब्यात घेतले.
नगरपरिषद निवडणुकीसाठी काल (सोमवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होती. त्यासाठी ते बीड रोडने कडेकोट बंदोबस्तात व्यासपीठाकडे येत असताना प्राथमिक आरोग्यकेंद्रासमोर ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले व त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी तालुकाप्रमुख मयुर डोके, कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख गणेश उगले, नितीन ससाणे, संतोष शिंदे, संदीप उगले, संयोग सोनवणे व कार्यकर्ते उपस्थित होते. अचानक सुरू झालेली घोषणाबाजी पाहून प्रशासनाची धावपळ उडाली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांना प्रशासनाने ताब्यात घेतले.
जामखेड-कर्जतमध्ये एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवार व सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वादात एमआयडीसी अडकली आहे. मोठ्या प्रमाणावर बेरोजगार तरुण मतदारसंघात आहेत. त्यांच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. पण अद्याप कर्जमाफी दिली नाही. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे कर्जमाफी मिळावी व कांद्याला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले होते.
Related
Articles
गोंदवलेकर महाराजांच्या ११२ व्या पुण्यतिथी महोत्सवास प्रारंभ
07 Dec 2025
विमान प्रवाशांच्या मदतीला रेल्वे आज पुणे-दिल्ली विशेष गाडी
07 Dec 2025
‘अवकाश’ प्रदर्शनाद्वारे रसिकांना मिळणार अनोखी पर्वणी
08 Dec 2025
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आजपासून सुरुवात
10 Dec 2025
अनिल अंबानी यांच्या मुलावर फसवणुकीचा गुन्हा
10 Dec 2025
सह्याद्री रूग्णालय तोडफोड प्रकरण
12 Dec 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सूरांच्या मैफलीतून उघडतोय श्रोत्यांच्या भावनांचा कप्पा
2
शीतल तेजवानीच्या घरांची झडती
3
पोरकेपणाची व्यथा (ऑर्फन)
4
जबाबदारीचे भान हवे!
5
महामार्ग, की अपघाताचे सापळे? (अग्रलेख)
6
विमान प्रवाशांची आर्थिक लूट