E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मृत सहा तरुणांवर अंत्यसंस्कार
Wrutuja Pandharpure
22 Nov 2025
ताम्हणी घाट अपघात
पुणे
: कोकणामध्ये पर्यटणासाठी निघालेल्या सहा मित्रांचा ताम्हिणी घाटात अपघात होवून मृत्यू झाला. तीन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर त्यांचे मृतदेह खोल दरीमधून बाहेर काढण्यात आले. पुण्यातील कोंढवे धावडे येथील हे सर्व रहिवाशी होते. त्यांच्यावर नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमी येथे गुरुवारी मध्यरात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सहलीसाठी निघालेले तरुणांचा सोमवारी मध्यरात्री अपघात झाला. ज्या हॉटेलमध्ये निवासासाठी आरक्षण केले होते. याठिकाणी पोहचले नसल्यामुळे तीन दिवसांनंतर या अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर या तरुणांचा शोध सुरू झाला. ताम्हिणी घाटाच्या रायगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. कोंडेथर गावानंतर घाट उतरताना पहिल्याच वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहन दरीत कोसळले. यामध्ये मोटारीतील सर्वच तरुणांचा मृत्यू झाला. पोलिस, बचाव पथकाच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दरीमधून बाहेर काढण्यात आले.
प्रथम शहाजी चव्हाण (वय २२), पुनीत सुधाकर शेट्टी (वय २०), श्री महादेव कोळी (वय १८), साहिल सहादू गोटे (वय २४), ओंकार सुनिल कोळी (वय १८), शिवा अरुण माने (१९) सर्व राहणार कोंढवे धावडे यांचे मृतदेह पोलिसांनी गुरुवारी रात्री नातेवाईकांच्या ताब्यात दिले. अपघात अतिशय गंभीर असल्यामुळे मृतदेहांची ओळख पटणे देखील अवघड झाले होते. या घटनेमुळे कोंढवे धावडे परिसरात शोकळा पसरली होती. मृतदेहांवर नवी पेठेतील वैकुंठ स्माशानभुमी येथे गुरुवारी मध्यरात्री अत्यसंस्कार करण्यात आले. अपघातात मृत्यू झालेले सर्व तरुण हे १८ ते २५ या वयोगटातील होते. कोण होतकरुन व्यावसायिक तर कोणी नुकतेच शिक्षण पूर्ण केले होते. आयुष्याची सुरुवात आता कुठेतरी होत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Related
Articles
ब्रिटिशकालीन रेल्वे पूल १६ दिवसांचाच सोबती
29 Nov 2025
नुकसान भरपाईचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला
04 Dec 2025
पुढीलवर्षी पाऊस लांबून अकल्पित घटनांचे संकेत
29 Nov 2025
धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी गीतेतून मार्गदर्शन : राज्यपाल देवव्रत
02 Dec 2025
अण्णा बनसोडे यांच्या विरोधातील याचिका रद्द करण्यासाठी नकार
29 Nov 2025
हुंड्यासाठी महिलेची हत्या; पतीला जन्मठेप
29 Nov 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कामगारांचे चांगभले?
2
‘ही मॅन’ची एक्झिट
3
पुण्यातील तपमान आठवडाभर स्थिर राहणार
4
अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी ५ डिसेंबरपर्यंतची मुदत
5
कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी संघर्ष
6
आणखी एक संधी (अग्रलेख)