E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्यातील तपमानात लक्षणीय वाढ
Wrutuja pandharpure
22 Nov 2025
पुणे
: शहर आणि उपनगरातील कमाल आणि किमान तपमानात वाढ झाली आहे. त्यामुळे थंडी कमी झाली आहे. हवेतील गारवाही कमी झाला असल्यामुळे दिवसभर ऊन, तर सायंकाळी किचिंत उकाडा जाणवत आहे. वाढलेले तपमान पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मागील काही दिवस शहर आणि उपनगरातील कमाल आणि किमान तपमानात लक्षणीय घट झाली होती. त्यामुळे हवेत गारवा वाढला होता. थंडीत मोठी वाढ झाली होती. वाढलेल्या थंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या होत्या. आता तपमानात वाढ झाल्याने शेकोट्या कमी झाल्या आहेत. पहाटे मात्र शहरात सर्वत्र धुके परत आहे. हवेत गारवा असल्याने सकाळी थंडी जाणवत आहे. सूर्य उगवल्यानंतर मात्र हवेतील गारवा कमी होत आहे. दुपारी ऊन पडत आहे.
शहरात काल ३० अंश कमाल, तर ११ अंश किमान तपमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसांत कमाल तपमानात एक अंशाने वाढ होणार आहे, तर किमान तपमानात २ अंशाने वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या गुरूवारपर्यंत तपमान स्थिर राहणार आहे. तपमान स्थिर राहणार असल्यामुळे थंडीतही वाढ होणार नाही. तसेच हवेतील गारव्यातही वाढ होणार नसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे थंडी अनुभवण्यासाठी पुणेकरांना आणखी काही दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
शहरात नोंदले गेलेले किमान तपमान
ठिकाण
तपमान
पाषाण
१०.९ अंश
शिवाजीनगर
११ अंश
कोरेगावपार्क १५.३ अंश
लाहगाव
१५.८ अंश
वडगावशेरी १६.८ अंश
Related
Articles
कामगारांचे चांगभले?
30 Nov 2025
ईडीच्या आरोपत्राची दखल घेण्याचा आदेश १६ रोजी
29 Nov 2025
किवळे-रावेत-डांगे चौक-काळेवाडी मार्गासाठी मेट्रोचा डीपीआर तयार करा
05 Dec 2025
ओला, उबेरकडून प्रवाशांची लुट सुरूच
02 Dec 2025
पुतीन दिल्लीत दाखल
05 Dec 2025
लक्ष्मी नक्की घरात येईल... पण श्रमाचे मूल्य मोजा, साधनाही हवी
01 Dec 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कामगारांचे चांगभले?
2
‘ही मॅन’ची एक्झिट
3
पुण्यातील तपमान आठवडाभर स्थिर राहणार
4
अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी ५ डिसेंबरपर्यंतची मुदत
5
कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी संघर्ष
6
आणखी एक संधी (अग्रलेख)