ज्येष्ठ भारतीयाला परत पाठवू नका   

अमेरिकेच्या न्यायालयाचा आदेश 

फिलाडेल्फिया : खून प्रकरणात चार दशके शिक्षा भोगलेल्या अणि नंतर सुटका झालेल्या भारतीय वंशाच्या ज्येष्ठ अमेरिकन नागरिकाला मायदेशी पाठवता येणार नाही, असा निकाल दोन अमेरिकेच्या न्यायालयांनी दिला आहे.
 
सुब्रमण्यम वेदाम (वय 64), असे त्याचे नाव आहे. खून प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यांनी 40 वर्षे तुरुंगवास भोगला होता. मात्र, दरम्यान, त्यांची शिक्षा माफ करण्यात आली. सुटकेनंतर त्यांना लुईझियाना येथील अलेक्झांड्रिया येथे काही काळ ताब्यात ठेवले  होते. तसेच विमानाने मायदेशी पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. सुब्बू या टोपण नावाने त्यांना ओळखले जात असून ते जन्मापासून अमेरिकेचे नागरिक आाहेत. गेल्या आठवड्यात त्यानां मध्य पेनसिल्व्हेनिया येथून भारतात पाठवण्यासाठी हलविले होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
 
दरम्यान, स्थलांतर विषयक न्यायालयाच्या न्यायाधीशांनी गुरुवारी आदेश काढून त्यांना मायदेशी पाठवता येणार नाही, असा निकाल दिला. तत्पूर्वी त्यांच्या वकिलांनी या प्रकरणी पेनसिल्व्हेनिया जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा न्यायालयाने प्रकरण स्थलांतर विषयक न्यायालयाशी संबंधित असल्याचे सांगितले होते. सुनावणीत न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, ते जरी भारतीय वंशाचे असले तरी त्यांचा जन्म अमेरिकेत झाला आहे.  मित्राच्या खून प्रकरणात त्यांना जन्मठेप झाली होती. मात्र नंतर त्यांची शिक्षा माफ केली होती.  त्यांची 3 ऑक्टोबर रोजी सुटका देखील झाली आहे. आता त्यांना अमेरिकेतून मायदेशी पाठवता येणार नाही. 

Related Articles