E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
देश
उत्तरप्रदेशात भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
04 Nov 2025
बाराबंकी : उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील देवा-फतेहपूर रस्त्यावर बिशुनपूर शहराजवळ सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला. वेगाने येणारा ट्रक आणि अर्टिगाच्या समोरासमोर झालेल्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले. जयपूर आणि हैदराबादमध्ये सोमवारी असाच भीषण अपघात झाला. जयपूर अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला, तर हैदराबाद अपघातात १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
ट्रक आणि अर्टिगाची धडक इतकी भीषण होती की, गाडीचा चक्काचूर झाला. मृतांमध्ये चालक श्रीकांत शुक्ला, प्रदीप सोनी, त्यांची पत्नी माधुरी सोनी आणि त्यांचा मुलगा नितीन यांचा समावेश आहे. कारमधील ८ जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मृतांमध्ये पाच पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
गाडीतील लोक कानपूरमधील बिठूर येथील गंगेत पवित्र स्नान करून परत येत असताना हा अपघात झाला. माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी शशांक त्रिपाठी आणि पोलीस अधीक्षक अर्पित विजयवर्गीय घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलवले. त्यांची गंभीर प्रकृती पाहून सर्व जखमींना लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. पोलीस अधीक्षक अर्पित विजयवर्गीय यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात हा अपघात वेगामुळे झाल्याचे दिसते. सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. घटनेनंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. क्रेनच्या साहाय्याने वाहने हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अवधेश कुमार यादव यांनी सांगितलं की, जखमींना स्थानिक सीएचसीमधून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने सर्वांना उपचारासाठी लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवले.
Related
Articles
राष्ट्रीय लोक दलाच्या अध्यक्षपदी पुन्हा चौधरी
17 Nov 2025
शिक्षकांनी चांगल्या गुणाचा अंगीकार करावा : डॉ. श्रीपाल सबनीस
14 Nov 2025
उद्या आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन प्रदर्शन
13 Nov 2025
दिल्ली स्फोटाबाबत आणखी खुलासे
17 Nov 2025
देवदर्शन सहलीतून स्वारगेट आगाराच्या उत्पन्नात वाढ
17 Nov 2025
अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखाला कन्यारत्न प्राप्त
15 Nov 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तपास ‘एनआयए’कडे
2
हे चिमुकले आता कुणापुढे हात पसरणार नाहीत!
3
बिहारला मिळाली पहिला जेन झी आमदार
4
कौशल्याधिष्ठीत शिक्षणाचीच गरज
5
कोंढव्यात एटीएसचा छापा
6
स्फोटाच्या तपासाचे नेतृत्व मराठी अधिकार्याकडे