E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक
Samruddhi Dhayagude
04 Nov 2025
मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील संघातील खेळाडूंना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. तसेच, पुणे आणि अहमदनगर (अहिल्यानगर) भागांत वाढलेल्या बिबट्यांच्या (Leopard) धोक्यावरही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.
भारतीय महिला क्रिकेट संघाचे राज्य सरकारकडून अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ज्या खेळाडूंनी विश्वचषकात देशाचे प्रतिनिधित्व केले, त्यांना राज्य सरकारकडून रोख पारितोषिक देण्यात येईल. स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचे यात नाव आहे.
पुणे, अहमदनगरमध्ये बिबट्यांचा वाढता धोका
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि अहमदनगर परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली. पुण्यात बिबट्याच्या हल्ल्यामुळे बरेच मृत्यू होत आहे. पुणे आणि अहमदनगर भागात बिबट्यांची संख्या सुमारे १,३०० च्या घरात पोहोचली आहे. बिबट्यांसंदर्भातला रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी राज्य सरकारने परवानगी द्यावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील प्रकल्पांचा आढावा
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेतल्याची माहिती दिली. एकूण २१ महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. प्रकल्पाची कामे नियोजित तारखेनुसार पूर्ण झाली नाहीत, अशा कंत्राटदारांना बोलावून त्यांच्या अडचणी ऐकून घेण्यात आल्या. कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, यासाठी त्यांना तात्काळ सूचना (तंबी) देण्यात आल्या आहेत.
Related
Articles
पाकिस्तानला हाँगकाँग इंटरनॅशनल सिक्सेस स्पर्धेचे विजेतेपद
12 Nov 2025
शिरूर तालुक्यात खताची टंचाई
12 Nov 2025
सीईटी परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार
12 Nov 2025
येडियुरप्पा यांच्याविरुद्धचा पोक्सो खटला रद्द करण्यास न्यायालयाचा नकार
14 Nov 2025
सांस्कृतिक उद्योजकता : महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा पाया
18 Nov 2025
ऑनलाइन सवलतींचा स्थानिक व्यापार्यांना फटका
17 Nov 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तपास ‘एनआयए’कडे
2
हे चिमुकले आता कुणापुढे हात पसरणार नाहीत!
3
बिहारला मिळाली पहिला जेन झी आमदार
4
कोंढव्यात एटीएसचा छापा
5
कौशल्याधिष्ठीत शिक्षणाचीच गरज
6
स्फोटाच्या तपासाचे नेतृत्व मराठी अधिकार्याकडे