E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
संपादकीय
विमानउड्डाणांची संख्या वाढणार
Wrutuja pandharpure
04 Nov 2025
वृत्तवेध
2025 च्या हिवाळी उड्डाण वेळापत्रकात अंदाजे सहा टक्के वाढ झाली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) मते, गेल्या वर्षीच्या 25,007 उड्डाणांच्या तुलनेत यंदा समान कालावधीमध्ये 26 हजार 495 उड्डाणे चालवली जातील. याचा अर्थ प्रवाशांना अधिक उड्डाण पर्याय, चांगले मार्ग कनेक्टिव्हिटी आणि जलद प्रवास सेवांचा अनुभव येईल. 2025 च्या हिवाळी वेळापत्रकात चार नवीन विमानतळ सुरू झाले आहेत. यामध्ये अमरावती (महाराष्ट्र), हिस्सार (हरियाणा), पूर्णिया (बिहार) आणि रुप्सी(आसाम) यांचा समावेश आहे. आता या विमानतळांवरून नियमित उड्डाणे सुरू होतील. त्यामुळे प्रवाशांना नवीन मार्गांवर प्रवास करण्याची संधी मिळेल. दरम्यान, काही विमानतळांवरील उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. ‘डीजीसीए’ने म्हटले आहे, की या वेळी उड्डाणांची संख्या वाढवल्याने हवाई तिकिटांच्या किमती नियंत्रित होण्यास मदत होईल आणि प्रवाशांना उड्डाणांच्या वेळा आणि पर्यायांबाबत अधिक पर्याय मिळतील. सुट्ट्या आणि सणांच्या हंगामामुळे हिवाळ्यात सामान्यतः हवाई वाहतुकीत वाढ होते. प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि चांगली सेवा देण्यासाठी विमान कंपन्यांनी उड्डाणांचा विस्तार केला आहे.
लहान आणि मध्यम आकाराच्या शहरांसाठी दिलासा
2025 च्या हिवाळी वेळापत्रकामुळे देशभरातील लहान आणि मध्यम आकाराच्या शहरांना दिलासा मिळेल. नवीन उड्डाणे सुरू केल्याने पूर्व, ईशान्य आणि मध्य भारतातील हवाई संपर्क सुधारेल. विशेषतः पूर्णिया (बिहार) आणि रुप्सी (आसाम)सारख्या नवीन विमानतळांवरील सेवा या प्रदेशातील प्रवाशांना चांगले आणि अधिक परवडणारे हवाई प्रवास पर्याय प्रदान करतील. त्यामुळे स्थानिक व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळेल.
‘इंडिगो’ने 2025 च्या हिवाळी वेळापत्रकात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. या वेळी कंपनीला 14 आठवड्यांमधील पंधरा हजार उड्डाणांसाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे ती देशातील सर्वांत मोठी देशांतर्गत विमान कंपनी बनली आहे. ‘एअर इंडिया’ची 4,277 उड्डाणे, ‘एआय एक्सप्रेस’ला 3,171 उड्डाणे आणि ‘स्पाइसजेट’ला 1,568 उड्डाणांसाठी परवानगी देण्यात आली आहे. ‘आकासा एअर’ला 1,027 उड्डाणांसाठी, ‘स्टार एअर’ला 538 उड्डाणांसाठी, ‘अलायन्स एअर’ला 520 उड्डाणांसाठी, ‘फ्लाय 91’ ला 196 उड्डाणांसाठी, ‘इंडिया वन’ला 126 उड्डाणांसाठी आणि ‘फ्लायबिग’ला 58 उड्डाणांसाठी मान्यता देण्यात आली आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट होते, की ‘इंडिगो’ने पुन्हा एकदा देशांतर्गत बाजारपेठेतील आपला सर्वांत मोठा वाटा राखला असून इतर विमान कंपन्यादेखील नवीन मार्ग आणि सेवांद्वारे आपले नेटवर्क वाढवत आहेत.
Related
Articles
पत्नी आणि बाळाला भेटण्यापूर्वीच जीव गमावला
16 Nov 2025
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात बदल आवश्यक
18 Nov 2025
पाकिस्तानातील स्फोटानंतर श्रीलंकेचे क्रिकेटपटू घाबरले
14 Nov 2025
अनिल अंबानी पुन्हा ईडीसमोर गैरहजर
18 Nov 2025
पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत
12 Nov 2025
शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
18 Nov 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तपास ‘एनआयए’कडे
2
हे चिमुकले आता कुणापुढे हात पसरणार नाहीत!
3
बिहारला मिळाली पहिला जेन झी आमदार
4
कोंढव्यात एटीएसचा छापा
5
कौशल्याधिष्ठीत शिक्षणाचीच गरज
6
स्फोटाच्या तपासाचे नेतृत्व मराठी अधिकार्याकडे