पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत ५१ संघांची निवड; १२ संघांची निवड चिठ्ठीद्वारे   

पुणे : हीरक महोत्सवात पदार्पण करीत असलेल्या महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठी ५१ संघांची निवड निश्चित करण्यात आली आहे. १२ संघांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली.
 
स्पर्धेचे अर्जवाटप १४ व १५ रोजी संस्थेच्या सुभाषनगरमधील कार्यालयात करण्यात आले. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेतील दर्जा खालावलेल्या १० संघांना वगळून ४१ पैकी ३९ संघांना थेट प्रवेश देण्यात आला. गेल्या वर्षी स्पर्धेत सहभागी झालेल्या २ संघांचे प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित नव्हते. प्रतीक्षा यादीत असलेल्या २१ संघांमधून १२ संघांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली. अर्जांची स्वीकृती ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळात ४१८, नातू वाडा, शनिवार पेठ येथे होणार आहे. आतापर्यंत ज्या संघांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यापैकी कुणी या दिवशी गैरहजर राहिल्यास इतर संघांची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
 
चिठ्ठीद्वारे निवडलेले महाविद्यालयीन संघात पी. व्ही. पीआयटी, बावधन, सिंहगड अकॅडमीचे इंजिनिअरिंग महाविद्यालय, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, वडगाव, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी, वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नवलमल फिरोदिया लॉ महाविद्यालय, पिंपरी-चिंचवड इंजिनिअरिंग महाविद्यालय, डी. ई. एस. पुणे युनिर्व्हसिटी, काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय, भारती विद्यापीठाचे फाईन आर्टस महाविद्यालय, जयवंतराव सावंत इंजिनिअरिंग महाविद्यालय, अजिंक्य डी. वाय. पाटील महाविद्यालयाचा समावेश आहे. 

Related Articles