कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म   

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आई बाबा झाले आहेत. अलिकडेच ही अभिनेत्री तिच्या कुटुंबासह रुग्णालयाबाहेर दिसली होती. आज समाजमाध्यमाद्वारे तिने तिच्या चाहत्यांना ही  गोड बातमी दिली. या जोडप्याने अधिकृत पोस्ट शेअर केल्यांनतर चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे आणि ते या जोडप्याचे अभिनंदन करताना दिसत आहेत. 
 
कियाराने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.मेट गाला असो किंवा समाजमाध्यमांवरील फोटो असो, वॉर २ ची ही अभिनेत्री अनेकदा तिच्या गरोदरपणाच्या प्रवासाचा आनंद घेताना दिसली.सुमारे तीन वर्षे डेट केल्यानंतर, त्यांनी २०२३ मध्ये राजस्थानमध्ये मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली.कियाराने २८ फेब्रुवारी रोजी तिच्या चाहत्यांसोबत तिच्या गरोदरपणाची आनंदाची बातमी शेअर केली होती.

Related Articles