E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संन्यस्त खड्ग नाटकावर वंचितचा आक्षेप
Wrutuja pandharpure
13 Jul 2025
घोषणाबाजी करत प्रयोग बंद पाडला
पुणे
: संन्यस्त खड्ग या नाटकाचा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रयोग सुरू असताना ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात प्रवेश करून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. अचानक घोषणा सुरू झाल्यामुळे नाट्यगृहात गोंधळ उडाला. विशेष म्हणजे नंतर दोन्ही बाजूने घोषणा सुरू झाल्याने गोंधळात भर पडली.
वि. दा. सावरकरांनी लिहिलेल्या ’संन्यस्त खड्ग’ या नाटकाचा प्रयोग शनिवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. नाटकाचा प्रयोग सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने ‘वंचित’चे कार्यकर्ते नाट्यगृहात गेले. या नाटकात गौतम बुद्धांची अवहेलना करण्यात आली असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी या नाटकाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यास विरोध म्हणून नाट्यगृहातील लोकांनीही ‘वंचित’च्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे हा प्रयोग थांबवावा लागला.
संन्यस्त खड्ग हे नाटक गौतम बुद्धांच्या चरित्रावर आधारित आहे. तथागत गौतम बुद्धांची बदनामी करणे, त्यांच्या विचारांची विटंबना करणे हाच मुख्य हेतू या नाटकाचा आहे. त्यामुळे या नाटकाचा प्रयोग होऊ देणार नाही, अशी भूमिका ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी घेतली. याआधीही या नाटकाच्या प्रयोगावर आक्षेप घेण्यात आला होता. काल पुहा नाटकाचा प्रयोग ठेवल्याने ‘वंचित’चे कार्यकर्ते संतप्त झाले होते.
नाटकाचे प्रयोग होऊ देणार नाही
संन्यस्त खड्ग या नाटकाचा मुंबईत प्रयोग झाल्यानंतर समाज माध्यमांवर आक्षेप नोंदविणार्या प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यामुळे या नाटकाच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्धांची बदनामी करू नका, असे आम्ही सांगितले होते. समतेचा आणि बुद्धांचा विचार येथे रूजणार, त्या व्यतिरिक्त इतर कोणते विचार आम्ही येथे रूजू देणार नाही. हिच वंचितची भूमिका आहे. गौतम बुद्धांचा अवमान करणारी, त्यांच्या विचारांची टिंगल करणारी घटना आम्ही सहन करणार नाही. या नाटकावर बंदी घालण्याची मागणी सरकारकडे करणार आहोत.
- सिद्धार्थ मोकळे, प्रवक्ते, वंचित
Related
Articles
पूंछमध्ये शाळेवर दरड कोसळून विद्यार्थी ठार
22 Jul 2025
खड्ड्यांची माहिती फोटो व पत्त्यासह महापालिकेला कळणार
24 Jul 2025
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती
25 Jul 2025
ड्रोनद्वारे क्षेपणास्त्र डागण्यात यश
25 Jul 2025
महागाईवाढ मंदावली? (अग्रलेख)
21 Jul 2025
इस्रायलने गाझातील युद्ध तातडीने थांबवावे
23 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर