कृषी निविष्ठा संचालकपदी अशोक किरनळकी   

फलोत्पादन संचालकपदी अंकुश माने

पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपदी अशोक किरनळकी यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तर फलोत्पादन संचालकपदी अंकुश माने यांची बदली करण्यात आली आहे. किरनकळी आणि माने नियमित कृषी संचालक असल्याने त्यांनी नियुक्ती कृषी आयुक्तालयातील मुख्य पदांवर अपेक्षित मानली जात होती.
 
कृषी सहसंचालकपदावर तीन वर्षांचा अनुभव असलेल्या अधिकार्‍यांना कृषी संचालकपदावर पदोन्नती देण्यात येते. तरी सुद्धा सरकारने मध्यंतरी कृषी सहसंचालक संवर्गातून तात्पुरत्या स्वरुपात भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास मुंबईतील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकारणाकडे (मॅट) आव्हान देण्यात आले होते. मॅटकडील दाखल मूळ अर्ज क्रमांक १४०९/२०२४ संदर्भात न्यायाधिकारणाने २७ मे रोजी दिलेल्या आदेशान्वये पदोन्नतीबाबतचा १४ ऑक्टोबर २०२४ रोजीचा शासन आदेश रद्द केला आहे. त्याची अंमलबजावणी शासन निर्णयानुसार करण्यात आली.
 
रफिक नाईकवाडी यांच्याकडे कृषी विस्तारचा अतिरिक्त पदभार मॅटच्या निकालान्वये नियमित पदस्थापना कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण वर्ग-२) या पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे यापूर्वीच हा पदभार होता तो कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान, नाईकडी यांच्याकडे मृदसंधारण संचालकपदाचा अतिरिक्त पदभार आहे. त्याबाबत शासन निर्णयात कोणतेच भाष्यकरण्यात आलेले नाही. सुनील बोरकर यांच्याकडे कृषी आयुक्तालयातील मृदसंधारण कृषी सहसंचालक येथे नियमित पदस्थापना करण्यात आली आहे. तर किरनकळी यांच्या बदलीने रिक्त झालेल्या येथील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा तथा आत्मा संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार बोरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.फलोत्पादन संचालक अंकुश माने यांची बदली केल्यानंतर त्यांच्याकडे कृषी आयुक्तालयांतर्गत कृषी अभियांत्रिकी संचालक या पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आल्याचे म्हटले आहे. अद्यापपर्यंत तरी कृषी अभियांत्रिकी संचालक असे पदच आयुक्तालयात कार्यरत नाही, असे पद निर्माण होण्याची शक्यता होत आहे. 

Related Articles