खरीपातील गतवर्षाची ३७९ कोटीची पीक विम्याची रक्कम मिळणार : आवटे   

पुणे : खरीप हंगामातील २०२४-२५ मधील पीक विमा नुकसान भरपाई पोटी शेतकर्‍यांना देय असलेली प्रलंबित पीक विम्याची सुमारे ३७९ कोटी रपयांची रक्कम लवकरच सबंधिताच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टलद्वारे ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली.
 
खरीप हंगामातील २०२४-२५ मध्ये पिकाची मंजूर नुकसान भरपाई ही ३ हजार ९०७ कोटी ८ लाख रुपयाएवढी आहे, तर राज्य सरकारने पीक विमा हप्ता १०२८ कोटी ९७ लाख रुपयांएवढी मंजूर केली आहे. त्यामुळे आता पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई व काढणी पश्चात नुकसान भरपाईची प्रलंबित रक्कम ३७९ कोटी रुपयांएवढी रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर विमा कंपनीमार्फत लवकरच जमा होईल, असे आवटे यांनी स्पष्ट केले.
 
खरीप हंगाम २०२४ बरोबरच रब्बी हंगाम २०२४-२५ मधील राज्य विमा हप्त्याचे २०७ कोटी रुपये मंजूर केले आहे. त्यामुळे खरीपाबरोबरच रब्बी हंगामातील पिकाला देखील पीक विम्याची नुकसान भरपाई वाटप आता होणार आहे. प्रत्यक्षात रब्बी हंगामातील नुकसान भरपाईची रक्कम १०५ कोटी रुपये आहे. म्हणजेच शेतकर्‍यांना लवकरच ३७९ कोटी आणि १०५ कोटी मिळून ४८४ कोटींची पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित असल्याची माहिती आवटे यांनी दिली.

Related Articles