जयंत पाटील भाजपमध्ये जाणार नाहीत : रोहित पवार   

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. मात्र राजीनाम्यावरून राजकीय तर्क लावण्याची गरज नाही. कारण जयंत पाटील हे भाजपात जाणार नाहीत. अशा विश्वास आमदार रोहित पवार यांनी शनिवारी व्यक्त केला. जयंत पाटील यांचा राजीनामा म्हणजे भाजपामध्ये सामील होण्याचे एक पाऊल आहे. असा तर्क व्यक्त केला जात आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, राजीमाना दिला याचा अर्थ ते भाजपात जाणार आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही. आता बदल होण्याची वेळ आली आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. 
 
शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यात झालेल्या बैठकीत पक्षाच्या आगामी धोरणावर चर्चा झाली. त्यानुसार, पक्षात काही महत्त्वाचे बदल होणार आहेत आणि हे सर्व जनतेला लवकरच दिसून येईल, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले. जयंत पाटील हे पक्षाचा विचार करणारे आहेत. त्यामुळे ते पक्ष सोडून जाणार नाहीत. जयंत पाटील यांचे मार्गदर्शन सर्वांना प्राप्त होईल. पक्षाच्या हितासाठी योग्य निर्णय घेण्यात येतील. 

Related Articles