व्हॉट्सऍप कट्टा   

आठवण बनून भेटतात सारेच
पण ओठांवर नाव बनून मोजकेच राहतात...
दु:खात सांत्वन करतात सारेच
पण आसवे पुसणारी मोजकीच असतात...
कामापुरते गोड बोलून वार करणारे सारेच असतात...
पण नात्यात गोडी ठेवून सोबत राहणारे क्वचितच सापडतात...
लोभ नसतो कशाचा फक्त नातं महत्त्वाचे असतं...
असे लोक मात्र नशिबानेच मिळत असतात.
----------
विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत 
आणि विचार मांडल्याशिवाय मते तयार होत नाहीत. 
आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला 
तर आपल्याला कळून येते मानवी आयुष्य म्हणजे 
दुसरे तिसरे काही नसून सुरुवातीच्या विचाराचे रूपांतर शेवटी मतामध्ये होणे हेच आहे.

Related Articles