महानगरपालिकेच्या ऐतिहासिक माहितीसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर   

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर आता पुणे महानगरपालिकेच्या ऐतिहासिक माहितीच्या उपलब्धतेसाठी होणार आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजेच १९५० पासूनचे सर्व कागदपत्र, निर्णय, प्रस्ताव, आणि माहिती एका चॅटबॉटद्वारे सहज उपलब्ध व्हावी, यासाठी पुणे महापालिकेने तयारी सुरू केली आहे. यासाठी चॅटबॉट तंत्रज्ञान विकसित करणार्‍या कंपन्यांशी प्राथमिक चर्चा सुरू असून, लवकरच हा उपक्रम प्रत्यक्षात येणार आहे.
 
या चॅटबॉटद्वारे शहरविकासासंबंधी विविध प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या भागातील रस्ता कधी तयार झाला? त्यासाठी किती निधी खर्च करण्यात आला? यासह एकाच कामाचे दोनदा बील काढले गेले आहे का, याचाही मागोवा घेता येणार आहे. त्यामुळे गैरव्यवहाराला आळा बसण्यास मदत होणार आहे, अशी महापालिकेची अपेक्षा आहे.

कर वसुली आणि योजनांच्या संदर्भासाठीही मदत

एआय चा उपयोग केवळ माहिती शोधण्यासाठीच नव्हे, तर कर धारणेचे मूल्यांकन, कर वसुली, प्रकल्पांचे ऑडिट आणि जुन्या फाईल्सच्या संदर्भासाठीही होणार आहे. नागरिक, पत्रकार, संशोधक आणि लोकप्रतिनिधींना या प्रणालीचा मोठा फायदा होणार आहे.

पारदर्शक तिकडे एक पाऊल

हा चॅटबॉट नागरिकांनाही उपलब्ध करून दिला जाणार असून, त्यातून पारदर्शक कारभाराची दिशा निश्चित केली जाईल. महापालिकेतील कामकाजावर नागरिकांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि माहिती अधिकार कायद्याअंतर्गत होणार्‍या विनंत्यांचा भार कमी करण्यासाठीही या उपक्रमाचा उपयोग होईल.
 
एआय चॅटबॉट तयार करणार्‍यां कंपनींसोबत बोलणे सुरु असून, ॒ चॅटबॉट तयार करणारी अद्यावत असलेल्या कंपनीकडे काम दिले जाईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर याचा कार्यालयीन कामकाजासाठी संदर्भ सहज मिळतील, ,तसेच नागरिकांना ही माहिती सहज मिळेल. 
 
- पृथ्वीराज बी.पी. अतिरिक्त आयुक्त मनपा, पुणे.

३० लाख कागदपत्रांचे डिजिटलायझेशन

महापालिकेच्या नगरसचिव विभागात सुमारे १२ लाख कागदपत्रे असून, त्यात मुख्यतः स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठरावांच्या प्रती आहेत. एकूण ३० लाखांहून अधिक कागदपत्रे स्कॅन करून त्या ॒ख प्रणालीत समाविष्ट केली जाणार आहेत. ही माहिती शोधण्याजोग्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 

Related Articles