लोकमान्य टिळक वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण   

पुणे : थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांच्या तिथीनुसार १०५ व्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या आंतरशालेय लोकमान्य टिळक वर्क्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवारी पार पडला.वक्तृत्व स्पर्धेत मराठी विषयातील पहिल्या गटात डी. ई. एस. सेकंडरी स्कूल प्रथम, दुसर्‍या गटात बारामती येथील अनेकान्त इंग्लिश मीडियम स्कूल, तर तिसर्‍या गटात अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्सने प्रथम क्रमांक पटकावला आहे. इंग्रजी विषयात  पहिल्या गटात अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, दुसर्‍या गटात विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, तर वारजे येथील सह्याद्री नॅशनल स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला आहे. हिंदी विषयात पहिल्या गटात प्रथम क्रमांक ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, दुसर्‍या गटात शिरवळ येथील ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालयाने पटकावला आहे. संस्कृत विषयात पहिल्या गटात अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स तर दुसर्‍या गटात भारतीय विद्याभवन परांजपे विद्या मंदिर शाळेने प्रथम क्रमांक मिळविला आहे.
 
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा शालेय प्रसार परीक्षा विभाग व लोकमान्य टिळक पुण्यतिथी मंडळातर्फे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या भाषांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचेे पारितोषिक वितरण टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते महात्मा फुले मंडईत शुक्रवारी झाले. विजेत्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम पारितोषिक देण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक, टिमविच्या प्रशासकीय मंडळाच्या सल्लागार डॉ. प्रणति रोहित टिळक, टिमविच्या शालेय प्रसार मंडळाच्या अध्यक्षा सरिता साठे, टिमवि ट्रस्टचे सचिव अजित खाडीलकर आदी उपस्थित होते. 
 
इयत्ता पाचवी-सहावी गटाकरिता ‘गुणसागर लोकमान्य टिळक’, ‘देशाची शान-लोकमान्य’, इयत्ता सातवी व आठवीसाठी ‘लोकमान्य टिळक-जीवनकार्य’, ‘राष्ट्रीय उत्सव आणि लोकमान्य टिळक’, इयत्ता नववी व दहावीसाठी ‘भारतीय स्वातंत्र संग्रामाचे जनक-लोकमान्य टिळक’, ‘लोकमान्य टिळक क्रांतिपर्व’ व शिक्षकांसाठी ‘स्वराज्याची चळवळ आणि लोकमान्य टिळक, लोकमान्य टिळक-एक राष्ट्रीय नेतृत्व’ हे स्पर्धेचे विषय होते. याप्रसंगी स्पर्धेतील प्रथम पारितोषिक मिळविणार्‍या विद्यार्थ्यांंची भाषणे झाली. शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती यावेळी होती.
 
स्पर्धेसाठी मराठी, इंग्रजी, हिंदी व संस्कृत या माध्यमांतून विविध गटांतून ५० हून अधिक शाळांमधून साडेचारशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या समन्वय समितीमध्ये डॉ. उमेश प्रधान, अंजली कर्वे यांचे विशेष सहकार्य लाभले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सचिन पालवे, प्रिया अत्रे, मीना साळुंके, विद्या गोडबोले, दिलीप फलटणकर, प्रतीक येतावडेकर, माधुरी गोखले, रामा कादगे, सायली बापट, अतिफ सुंडके, अश्विनी पालवणकर, भाग्यश्री सुपनेकर
यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका तांबे यांनी केले, तर, शलाका मुळे यांनी आभार मानले. 

आंतरशालेय लोकमान्य टिळक वक्तृत्व स्पर्धेचे विजेते

मराठी माध्यम

गट क्र. १ : निधी वाळिंबे (प्रथम) डी. ई. एस. सेकंडरी स्कूल, अर्श कालेकर (द्वितीय) नंदिनी यवलकर (तृतीय) अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, शौर्य देसाई (तृतीय) बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडी. स्कूल, अनन्या कामत, अनेकान्त इंग्लिश मिडी. स्कूल, अर्णव अयाचित, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला.
गट क्र. २ : स्वरित अहिरे (प्रथम) अनेकान्त इंग्लिश मिडी. स्कूल, बारामती., मुक्ता धाडवे (द्वितीय)  अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, स्वरा खोपकर (तृतीय) एच. एच.सी. पी. हायस्कूल अ‍ॅन्ड ज्युनियर कॉलेज फॉर गर्ल्स हुजुरपागा,  मयांक भिडे (उत्तेजनार्थ) पी.ई.एस. मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूल, प्रथमेश गुणवरे, व्ही. पी. अनंतराव पवार स्कूल चिंचोली
गट क्र. ३ : अन्वी भंडारी(प्रथम) अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, श्रेया घाडगे (द्वितीय) विद्या  निकेतन इंग्लिश मिडी. स्कूल. (द्वितीय), वैशाली कोरडे (उत्तेजनार्थ) 

इंग्रजी माध्यम

गट क्र. १ : सई रोकडे (प्रथम) अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, मिथाली पाटील (द्वितीय) हुजूरपागा कात्रज प्राथमिक शाळा, अदिती बाभळे (तृतीय) अनेकान्त इंग्लिश मिडी. स्कूल, गौरवी बनसोडे (उत्तेजनार्थ)  भारतीय विद्याभवन परांजपे विद्या मंदिर, वियान भोसले, फिनिक्स स्कूल.
गट क्र. २ : ग्रहिश पाटील (प्रथम) विद्या निकेतन इंग्लिश मिडी. स्कूल, झोया शेख (द्वितीय) सह्याद्री नॅशनल स्कूल, राजवर्धिनी शिंदे (तृतीय) अहिल्यादेवी हास्कूल फॉर गर्ल्स, शिवतेज नलावडे (उत्तेजनार्थ) भारत चिल्ड्रन अ‍ॅकॅडमी वालचंद नगर,
गट क्र. ३ : मैथिली बाबर (प्रथम) सह्याद्री नॅशनल स्कूल, अद्विका चांदगुडे (द्वितीय) विद्या निकेतन इंगिल्श मिडी. स्कूल, सिमी कोठावडे (तृतीय)  सिंबायोसिस स्कूल, रिया शिवेकर,  रुपा देवाडिगा (उत्तेजनार्थ) विश्वकर्मा विद्यालय.

हिंदी माध्यम

 गट क्र. १ : मैत्रियी भाटे (प्रथम) ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, प्रगती ताठे (द्वितीय) ज्ञानसंवर्धनी माध्यमिक विद्यालय, स्वरा सांगळे (उत्तेजनार्थ) 
 गट क्र. २ : मृणाल चव्हाण (प्रथम) ज्ञानसंवर्धनी माध्यमिक विद्यालय, सोयरा भामरे (द्वितीय) सिम्बायोसिस स्कूल, सई यादव (तृतीय) विश्वकर्मा विद्यालय, वेदांगी ढमाले (उत्तेजनार्थ) विश्वकर्मा विद्यालय, वैदेही केचाळे, एच.एस.सी.पी. हायस्कूल,

संस्कृत माध्यम 

गट क्र.१ : साजिरी जोशी (प्रथम) अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, स्पृहा साठे (उत्तेजनार्थ) ज्ञानप्रबोधिनी शाळा
गट क्र.२ : निहारिका वायकर (प्रथम) भारतीय विद्याभवन परांजपे विद्या मंदिर, शांभवी दीक्षित (द्वितीय) अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, माधवी खांबे (उत्तेजनार्थ) डी.आय.सी.इंग्लिश स्कूल.
 
सर्वसाधारण विजेते - इंग्रजी
सह्याद्री नॅशनल स्कूल, वारजे
सर्वसाधारण विजेते  - मराठी
अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स
 

Related Articles