E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुरूपौर्णिमेनिमित्त फुलबाजार बहरला
Wrutuja pandharpure
09 Jul 2025
घाऊक, किरकोळ बाजारात १० ते १५ टक्क्यांनी वाढ
पुणे
: दरवर्षी गुरूपोर्णिमेनिमित्त विविध प्रकारच्या फुलांना ग्राहकांकडून मोठी मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात बाजारात फुले विक्रीसाठी पाठविण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे मंगळवारी फुलबाजार बहरला होता.
शहरात साईबाबा, शंकर महाराज, स्वामी समर्थ, दत्त मंदिरासह विविध धार्मिक ठिकाणी गुरूपौर्णिमेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गुरूपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मंदिरांची सजावट तसेच देवाला फुले वाहण्यासह गुरूजणांना पुष्प भेट देण्याकडे भक्तांसह शिष्यांकडून मुलांना मागणी असते. तसेच फुल विक्रेते या दिवशी नेहमीपेक्षा तूलनेत अधिकच्या फुलांची खरेदी करत असतात. काल गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात फुलांच्या खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढली होती. आवकही मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र, त्यात चांगल्या फुलांचे प्रमाण कमी आहे. चांगल्या प्रतीच्या फुलांच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशी माहिती व्यापारी अरूण वीर व सागर भोसले यांनी दिली.
उद्या (गुरूवारी) गुरूपौर्णिमा आहे. यादिवशी, गुरूपुजन केले जाते. तसेच दर्शनासाठी मंदिरात जाणार्यांची संख्याही मोठी असते. या काळात सजावट आणि हार तयार करण्यासाठी लागणार्या फुलांना जास्त मागणी असते. त्याअनुषंगाने शेतकरी माल राखून ठेवतात. यंदाही मार्केट यार्डातील फुल बाजारात जिल्ह्यासह सातारा, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होत आहे.
बाजारात दाखल झालेल्या फुलांची शहर, उपनगरासह परगावाहून आलेल्या खरेदीदारांकडून मंगळवारी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत होती. परिणामी, बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होऊन उलाढालही चांगली झाली आहे. दरम्यान, आज (बुधवारी) अधिक आवक होऊन दर कायम राहतील अशी शक्यता अडतदार सागर भोसले यांनी वर्तविली.
सजावटीच्या फुलांना मागणी
दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरांच्या सजावटीसाठी डच गुलाब, कार्नेशियन, जर्बेरा यांसह विविध फुलांची खरेदी ग्राहकांकडून करण्यात आली आहे. गुरूपौर्णिमा उद्या (गुरूवारी) असून सद्य:स्थितीत दर्जेदार व टिकाऊ फुलांची खरेदी केली जात आहे. आज (बुधवारी) झेंडू, शेवंती यांसह उर्वरित फुलांची खरेदी ग्राहकांकडून करण्यात येईल. त्यानंतर रात्रीपासून सजावटीच्या कामाला सुरूवात होईल.
- अरूण वीर, व्यापारी, मार्केटयार्ड
दर्जेदार फुलांच्या खरेदीकडे कल
जिल्ह्यासह पुणे विभागात पाऊसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे विक्रीसाठी बाजारात दाखल झालेल्या फुलांमध्ये भिजलेल्या आणि दर्जाहिन मालाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, ग्राहकांकडून दर्जेदार आणि कोरड्या मालाला मागणी आहे. चांगल्या प्रतीच्या फुलांना अधिक दर मिळत आहे. घाऊक बाजारासह किरकोळ बाजारातही फुलांचे दर वाढले आहेत. आज (बुधवारी) फुलांनी मोठी मागणी असणार आहे.
- सागर भोसले, व्यापारी, मार्केटयार्ड
फुलबाजारातील फुलांचे दर
फुले
घाऊक दर (प्रतिकिलो)
झेंडू
६० ते ८० रुपये
शेवंती
१५० ते २०० रुपये
गुलछडी
१५० ते २०० रुपये
जुई
५०० ते ६०० रुपये
साधा गुलाब
३० ते ४० रुपये (गड्डी)
डच गुलाब
१५० ते १६० रुपये (२० नग)
Related
Articles
निवृत्तीनंतर सरकारी पद घेणार नाही : गवई
26 Jul 2025
मग स्फोट घडवले कोणी?
27 Jul 2025
चांदणी चौकात दुभाजकावर आदळून रिक्षा चालकाचा मृत्यू
22 Jul 2025
एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरले
22 Jul 2025
गुन्हेगारी हद्दपार करणार
25 Jul 2025
भीमाशंकरसाठी एसटीकडून जादा गाड्यांचे नियोजन
27 Jul 2025
निवृत्तीनंतर सरकारी पद घेणार नाही : गवई
26 Jul 2025
मग स्फोट घडवले कोणी?
27 Jul 2025
चांदणी चौकात दुभाजकावर आदळून रिक्षा चालकाचा मृत्यू
22 Jul 2025
एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरले
22 Jul 2025
गुन्हेगारी हद्दपार करणार
25 Jul 2025
भीमाशंकरसाठी एसटीकडून जादा गाड्यांचे नियोजन
27 Jul 2025
निवृत्तीनंतर सरकारी पद घेणार नाही : गवई
26 Jul 2025
मग स्फोट घडवले कोणी?
27 Jul 2025
चांदणी चौकात दुभाजकावर आदळून रिक्षा चालकाचा मृत्यू
22 Jul 2025
एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरले
22 Jul 2025
गुन्हेगारी हद्दपार करणार
25 Jul 2025
भीमाशंकरसाठी एसटीकडून जादा गाड्यांचे नियोजन
27 Jul 2025
निवृत्तीनंतर सरकारी पद घेणार नाही : गवई
26 Jul 2025
मग स्फोट घडवले कोणी?
27 Jul 2025
चांदणी चौकात दुभाजकावर आदळून रिक्षा चालकाचा मृत्यू
22 Jul 2025
एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरले
22 Jul 2025
गुन्हेगारी हद्दपार करणार
25 Jul 2025
भीमाशंकरसाठी एसटीकडून जादा गाड्यांचे नियोजन
27 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
2
महागाईवाढ मंदावली? (अग्रलेख)
3
‘डॉन’ चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे निधन
4
बँकिंग क्षेत्राची स्थिती मजबूत
5
मंथरेच्या सल्ल्याने कैकयी दशरथावर रुसली!
6
गणेशभक्तांसाठी कोकण मार्गावर २५० एसटी बस