E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात सरकारी यंत्रणांची टोलवाटोलवी
Wrutuja pandharpure
09 Jul 2025
पुणे
: पुणे जिल्हा परिषदेच्या दिव्यांग ठरणार्या शिक्षकांची वैद्यकीय तपासणीस ससून रुग्णालयाने नकार दिल्याने जिल्हा परिषदेची मोठी पंचायत झाली आहे. मात्र, दिव्यांगाच्या नावाखाली बोगस प्रमाणपत्र मिळवूून बदल्यांमध्ये सवलत घेणार्या शिक्षकांची तपासणी करण्याचा तसेच फसवणूक करणार्या शिक्षकांवर कारवाईची मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेने केली आहे. त्यामुळे दिव्यांग आयुक्तालयाने अशा शिक्षकांवर कारवाईची जिल्हा परिषदेला सूचना केली आहे. मात्र, दिव्यांग म्हणावणार्या शिक्षकांच्या कारवाईवरून सरकारी यंत्रणांची एकमेकांवर टोलवाटोलवी सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या संवर्ग एक आणि दोन मधील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. योग्य ठिकाणी बदली होण्यासाठी शिक्षकांनी चक्क, बहिरे, आंधळे, लुळे असल्याची बोगस प्रमाणपत्रे दिल्याचे समोर आले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने बी जे मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांकडे शिक्षकांची यादी पाठवून शिक्षकांच्या दिव्यांगाची फेरतपासणी करण्याची विनंती केली होती. मात्र, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव यांनी जिल्हा परिेदेला उलट पत्र पाठवून ही तपासणी करण्यास आम्ही असमर्थ असल्याचे कळविले. दिव्यांग शिक्षकांच्या फेर तपासणीसाठी मुंबईतील जे जे रुग्णालय तसेच उपसंचालक आरोग्य सेवा यांच्या अखत्यारीतील रुग्णालयात शिक्षकांना पाठविण्यात यावे असे ससून रुग्णालयाने सूचवले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या दिव्यांगाची तपासणी करायची काय असा प्रश्न जिल्हा परिषदेला सतावत आहे.
यासंदर्भात प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेने दिव्यांग आयुक्तालयाचे लक्ष वेधून त्यांच्याकडे कारवाईची मागणी केली. त्यावर दिव्यांग आयुक्त प्रवीण पुरी यांनी पत्र पाठवून अशा शिक्षकांवर कारवाई करण्याची सूचना जिल्हा परिषदेला केली आहे. त्यामुळे बोगस प्रमाणपत्राच्या कारवाईवरून जिल्हा परिषद, ससून रुग्णालय आणि दिव्यांग कल्याण आयुक्तालयाची एकमेकांकडे टोलवाटोलवी सुरू आहे.
सरकारची फसवणूक केली
बदल्यातून सूट घेतलेल्या शिक्षकांनी अपंगत्वाची खोटी व चुकीची प्रमाणपत्रे सादर करून सरकारची दिशाभूल केली आहे. दिव्यांग शिक्षक चारचाकी वाहन चालवित आहेत. ते दिव्यांग असताना वाहन परवाना मिळविताना त्यांनी सरकारची फसवणूक केली आहे.
Related
Articles
‘डॉ. दीपक टिळक यांनी लोकमान्यांचा वैचारिक वारसा जपला’
25 Jul 2025
लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीतर्फे डॉ. टिळक यांना श्रद्धांजली
24 Jul 2025
हुंड्यासाठीच वैष्णवीवर अत्याचार
20 Jul 2025
ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या
22 Jul 2025
25,000 च्या खाली....
21 Jul 2025
तब्बल 23 कोटी खर्च केलेला रस्ता 10 महिन्यातच उखडला
21 Jul 2025
‘डॉ. दीपक टिळक यांनी लोकमान्यांचा वैचारिक वारसा जपला’
25 Jul 2025
लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीतर्फे डॉ. टिळक यांना श्रद्धांजली
24 Jul 2025
हुंड्यासाठीच वैष्णवीवर अत्याचार
20 Jul 2025
ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या
22 Jul 2025
25,000 च्या खाली....
21 Jul 2025
तब्बल 23 कोटी खर्च केलेला रस्ता 10 महिन्यातच उखडला
21 Jul 2025
‘डॉ. दीपक टिळक यांनी लोकमान्यांचा वैचारिक वारसा जपला’
25 Jul 2025
लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीतर्फे डॉ. टिळक यांना श्रद्धांजली
24 Jul 2025
हुंड्यासाठीच वैष्णवीवर अत्याचार
20 Jul 2025
ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या
22 Jul 2025
25,000 च्या खाली....
21 Jul 2025
तब्बल 23 कोटी खर्च केलेला रस्ता 10 महिन्यातच उखडला
21 Jul 2025
‘डॉ. दीपक टिळक यांनी लोकमान्यांचा वैचारिक वारसा जपला’
25 Jul 2025
लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीतर्फे डॉ. टिळक यांना श्रद्धांजली
24 Jul 2025
हुंड्यासाठीच वैष्णवीवर अत्याचार
20 Jul 2025
ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या
22 Jul 2025
25,000 च्या खाली....
21 Jul 2025
तब्बल 23 कोटी खर्च केलेला रस्ता 10 महिन्यातच उखडला
21 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)