E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
आमदार कटके यांचे नाव वगळले
Wrutuja pandharpure
08 Jul 2025
शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार
पुणे
: येथील शिवाजीराव भोसले बँकेच्या गैरव्यवहारातून शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांचे नाव पोलिसांनी वगळले आहे. तसेच, निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मालमत्ता लपवण्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आमदार कटके यांच्या विरोधात जनहित अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आमदार कटके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या गैरव्यवहारात बँकेचे संचालक अनिल भोसले यांसह काही जणांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने २०२० आणि २०२१ मध्ये अटक केली होती. याच बँकेत आमदार कटके यांनी वाघोली येथील आपली मालमत्ता गहाण ठेऊन सुमारे ९ कोटींचे कर्ज उचलले होते. तसेच, भागीदारी असलेल्या मयुरी आनंद इमारतीतील स्वत:च्या चार सदनिका गहाण ठेऊन कर्ज घेतले होते.पोलिसांनी कर्जबुडव्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याची कारवाई केली. तथापि, आमदार कटके यांच्या मालमत्ता फक्त प्रतिकात्मक स्वरुपात जप्त केल्या. त्यामुळे आजही आमदारांकडे त्या जागांचा ताबा आहे.
हे पुणे पोलिसांनी राजकीय दबावाखाली केल्याचे अर्जात म्हटले आहे.तसेच, एका पीडित महिलेला आमदार कटके यांनी करार करून ८० लाख बँक खात्यामधून दिले होते. ते पैसेही शिवाजीराव भोसले बँकेकडून घेतलेल्या कर्जातून फिरवले असल्याचा आरोप अर्जात केला आहे.उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना आमदार कटके यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश द्यावेत. तसेच, निवडणूक आयोगाला खोटे प्रतिज्ञापत्र दिल्याबद्दल योग्य ती कारवाई करण्याची सूचना करावी, अशी विनंती तिरोडकर यांनी अर्जात केली आहे.
आमदार कटके यांनी भागीदारी असलेल्या आस्थापनांसाठी तब्बल २० कोटी ९५ लाख ८५ हजारांचे कर्ज शिवाजीराव भोसले बँकेकडून घेतल्याचे समोर आले आहे; मात्र या संदर्भात आमदार कटके यांच्यावर तसेच भागीदारी असलेल्या आस्थापनांमधील इतर सदस्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. महत्त्वाचे म्हणजे गृहप्रकल्पांमध्ये महारेराच्या कायद्याचे उल्लंघन देखील करण्यात आले आहे. त्यामुळे आमदार कटके यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केतन तिरोडकर यांनी अर्जाद्वारे उच्च न्यायालयाकडे केली आहे.
या आस्थापनांनी घेतलेली कर्ज पुढीलप्रमाणे
आर्यन डेव्हलपर्स : ८ कोटी ५४ लाख ३४ हजार रुपये
संजीत बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड : ६ कोटी ५३ लाख ८३ हजार ६०० रुपये
आर्यन असोसिएट्स : १ कोटी ५५ लाख ४९ हजार रुपये
आर्यन प्रमोटर्स अॅन्ड बिल्डर्स : ४ कोटी ३२ लाख १९ हजार
आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित अर्ज दाखल करण्यात आल्याने शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारसंघातील हजारो मतदारांना त्यांनी उज्जैन आणि परिसरातील तीर्थस्थळांना रेल्वेने दर्शन दिले होते.
Related
Articles
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद अडचणीत
22 Jul 2025
धान्य, साखर स्वस्त; दूध, तेल महाग
23 Jul 2025
विमानप्रवास होईल बसइतका स्वस्त?
22 Jul 2025
जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि कुसुमाग्रज अध्यासन केंद्राचे आज उद्घाटन
24 Jul 2025
थायलंड-कंबोडिया संघर्षामुळे हजारो नागरिकांचे पलायन
26 Jul 2025
दोन्ही देशांचा फायदा (अग्रलेख)
28 Jul 2025
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद अडचणीत
22 Jul 2025
धान्य, साखर स्वस्त; दूध, तेल महाग
23 Jul 2025
विमानप्रवास होईल बसइतका स्वस्त?
22 Jul 2025
जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि कुसुमाग्रज अध्यासन केंद्राचे आज उद्घाटन
24 Jul 2025
थायलंड-कंबोडिया संघर्षामुळे हजारो नागरिकांचे पलायन
26 Jul 2025
दोन्ही देशांचा फायदा (अग्रलेख)
28 Jul 2025
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद अडचणीत
22 Jul 2025
धान्य, साखर स्वस्त; दूध, तेल महाग
23 Jul 2025
विमानप्रवास होईल बसइतका स्वस्त?
22 Jul 2025
जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि कुसुमाग्रज अध्यासन केंद्राचे आज उद्घाटन
24 Jul 2025
थायलंड-कंबोडिया संघर्षामुळे हजारो नागरिकांचे पलायन
26 Jul 2025
दोन्ही देशांचा फायदा (अग्रलेख)
28 Jul 2025
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद अडचणीत
22 Jul 2025
धान्य, साखर स्वस्त; दूध, तेल महाग
23 Jul 2025
विमानप्रवास होईल बसइतका स्वस्त?
22 Jul 2025
जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि कुसुमाग्रज अध्यासन केंद्राचे आज उद्घाटन
24 Jul 2025
थायलंड-कंबोडिया संघर्षामुळे हजारो नागरिकांचे पलायन
26 Jul 2025
दोन्ही देशांचा फायदा (अग्रलेख)
28 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
2
‘डॉन’ चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे निधन
3
गणेशोत्सव निर्बंधमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील : रासने
4
गणेशभक्तांसाठी कोकण मार्गावर २५० एसटी बस
5
ब्रिटनचे लढाऊ विमान दुरुस्तीनंतर झेपावले
6
गणेश उत्सवात परवानगीची वेगळी गरज नाही