E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
५२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
Wrutuja pandharpure
08 Jul 2025
२४ तासानंतर पूर्ववत
पुणे
: महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही इन्फोसिस ते २२० केव्ही पेगासस अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत हिंजवडी फेज-२ मेट्रो स्थानकाजवळ रविवारी दुपारी २.१० च्या सुमारास बिघाड झाल्यामुळे महावितरणच्या गणेशखिंड व पुणे ग्रामीण मंडळातील सुमारे ५२ हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा रविवारी दुपारपासून ठप्प झाला होता. परंतु, महावितरणने युद्धपातळीवर नियोजन करुन सोमवारी पहाटेपर्यंत सर्व लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने व टप्पा-टप्प्याने सुरळीत केल्याने नागरी भागांना दिलासा मिळाला आहे. तर काही उच्चदाब ग्राहकांना सुरु होण्यास अवधी लागणार आहे.
महापारेषण कंपनीने नियोजित देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी (दि. ६) सकाळी ११ ते दुपारी १ असा वीजपुरवठा बंद केला होता. देखभाल दुरुस्तीचे काम आटोपून वीजपुरवठा सुरु करताना रविवारी दुपारी २.१० वाजेच्या सुमारास २२० केव्ही इन्फोसिस ते २२० केव्ही पेगासस अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत मोठा बिघाड झाला. परिणामी महावितरणच्या ग्राहकांना वीजपुरवठा करणार्या २२ केव्हीच्या २५ वाहिन्या, अतिउच्चदाबचे इन्फोसिस व नेक्सट्रा हे दोन ग्राहक अशा ९१ उच्चदाब आणि ५२ हजारांहून अधिक लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळित झाला होता. यामध्ये पिंपरी विभागातील २० हजार व मुळशी विभागातील ३२ हजार घरगुती व वाणिज्यिक लघुदाब ग्राहकांचा समावेश आहे.
रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत महापारेषणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न चालूच होते. तोपर्यंत त्यांनी बिघाड घोषित केला नव्हता. तत्पूर्वीच महावितरणने संभाव्य वीजसंकट ध्यानात घेऊन पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले होते. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर नियोजन करण्यात आले.
जनमित्रांपासून मुख्य अभियंत्यांपर्यंत व देखभाल दुरुस्तीचे काम करणार्या एजन्सी व त्यांच्या कामगारांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे महावितरणला वीजपुरवठा कमी कालावधीत सुरु करणे शक्य झाले. महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे, गणेशखिंड मंडलाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड व पुणे ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता युवराज जरग यांचेसह सर्व वरिष्ठ अभियंत्यानी अचूक नियोजन करुन वीजपुरवठा पर्यायी मार्गाने वळविण्यात यश मिळवत मोठ्या वीज संकटावर मात केली आहे.
Related
Articles
ट्रम्प बाबतच्या फतव्याने मौलवींनी जमवले ३५० कोटी
23 Jul 2025
भारताचा पहिला डाव 358 धावांवर संपुष्टात
25 Jul 2025
हॉटेल मालकांनी परवाने दर्शनी भागात लावावेत
23 Jul 2025
थायलंड-कंबोडिया संघर्षामुळे हजारो नागरिकांचे पलायन
26 Jul 2025
जगदीप धनखड यांचा राजीनामा
22 Jul 2025
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक आरटीओच्या रडारवर
21 Jul 2025
ट्रम्प बाबतच्या फतव्याने मौलवींनी जमवले ३५० कोटी
23 Jul 2025
भारताचा पहिला डाव 358 धावांवर संपुष्टात
25 Jul 2025
हॉटेल मालकांनी परवाने दर्शनी भागात लावावेत
23 Jul 2025
थायलंड-कंबोडिया संघर्षामुळे हजारो नागरिकांचे पलायन
26 Jul 2025
जगदीप धनखड यांचा राजीनामा
22 Jul 2025
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक आरटीओच्या रडारवर
21 Jul 2025
ट्रम्प बाबतच्या फतव्याने मौलवींनी जमवले ३५० कोटी
23 Jul 2025
भारताचा पहिला डाव 358 धावांवर संपुष्टात
25 Jul 2025
हॉटेल मालकांनी परवाने दर्शनी भागात लावावेत
23 Jul 2025
थायलंड-कंबोडिया संघर्षामुळे हजारो नागरिकांचे पलायन
26 Jul 2025
जगदीप धनखड यांचा राजीनामा
22 Jul 2025
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक आरटीओच्या रडारवर
21 Jul 2025
ट्रम्प बाबतच्या फतव्याने मौलवींनी जमवले ३५० कोटी
23 Jul 2025
भारताचा पहिला डाव 358 धावांवर संपुष्टात
25 Jul 2025
हॉटेल मालकांनी परवाने दर्शनी भागात लावावेत
23 Jul 2025
थायलंड-कंबोडिया संघर्षामुळे हजारो नागरिकांचे पलायन
26 Jul 2025
जगदीप धनखड यांचा राजीनामा
22 Jul 2025
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक आरटीओच्या रडारवर
21 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
2
महागाईवाढ मंदावली? (अग्रलेख)
3
‘डॉन’ चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे निधन
4
बँकिंग क्षेत्राची स्थिती मजबूत
5
मंथरेच्या सल्ल्याने कैकयी दशरथावर रुसली!
6
गणेशभक्तांसाठी कोकण मार्गावर २५० एसटी बस