E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शाळांमध्ये छोट्या वारकर्यांचा पालखी सोहळा
Wrutuja pandharpure
05 Jul 2025
पुणे इंटरनॅशनल स्कूलच्या ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांचा सहभाग
धानोरी : विद्यानगर येथील पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने विद्यानगर परिसरात वारी निमित्त ग्रंथदिंडी काढण्यात आली. दिंडीमधील प्रत्येक विद्यार्थी वाकर्याकडून शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले.
शाळेतील ३०० विद्यार्थ्यांनी या ग्रंथ दिंडीमध्ये सहभाग घेतला. टाळ मृदुंगाच्या व ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजराने शाळेभोवतील परिसर दुमदुमून गेला. वारकरी व विठ्ठल रुखुमाईची वेशभूषा केलेले विद्यार्थी यांनी दिंडीमध्ये फुगडी , भजन ,गायन ,व इतर खेळ खेळत होते.शाळेच्या उपाध्यक्षा अॅड. रेणुका चलवादी , प्राचार्य स्मिता लोंढे , उपप्राचार्य अश्विनी मोहिते व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
-----------
मोझे प्राथमिक शाळेत छोट्या वारकर्यांचा पालखी सोहळा
सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ति |रखुमाईच्या पती सोयरिया ॥
गोड तुझे रूप गोड तुझे नाम |
देई मज प्रेम सर्व काळ ॥
येरवडा :पंढरीची वारी म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे अध्यात्मिक सांस्कृतिक वैभव लाखो वारकरी ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालखी बरोबर मुखी विठ्ठल नामघोष करीत उत्साहाने ,आनंदाने ,शिस्तीत व भक्ती रसाचा वारसा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी गेनबा सोपनराव मोझे प्रशालेमध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
शाळेच्या प्रंगणात विठ्ठल नामाची शाळाच भरली होती .सर्व विद्यार्थी वारकरी वेशात आले होते .कपाळाला अष्टगंध ,डोक्यावर टोपी, गळ्यात टाळ ,मृदुंग, अंगात पांढरा सादरा अशा वेशात बाल वारकरी शाळेत आले होते .मुलींनी देखील छान साड्या घातल्या होत्या .डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते .सर्व वातावरण भक्तीमय झाले होते. जणू काही पंढरपूरचा पांडुरंगच शाळेमध्ये अवतरला होता पालखी सोहळ्यासाठी पालखी छान सजवली होती .विठ्ठल ,रुक्मिणी ,संत तुकाराम संत ज्ञानेश्वर ,संत मुक्ताबाई ,संत सोपान देव या संतांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली होती. प्रशालेमध्ये जय हरी विठ्ठल ,विठ्ठल विठ्ठल या नामाचा जय घोष अखंड सुरू होता .संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.
प्रशालेतील सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी पालखी सोहळा मोठ्या आनंदात साजरा केला .याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ मोझे , उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, शाळा समिती अध्यक्ष अलका पाटील. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रशांत डाळिंबकर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यामध्ये सर्व शिक्षकांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी केलेल्या पालखी सोहळ्यात हरीनामा गजर करत आनंद लुटल.
--------------
एस. एस. इंग्लिश शाळेत चिमुकल्या वैष्णवांचा मेळा
विश्रांतवाडी : चिमुकल्या वारकर्यांनी हाती भगवे झेंडे घेऊन, डोक्यावर तुळशीचे रोपटे, गळ्यात टाळ , मृदुंग , वीणा आणि मुखात हरीनामाचा गजर करत मोहनवाडी येथील एस. एस. इंग्लिश शाळेत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरू संत तुकाराम यांच्या पालख्यांचे आयोजन करून आषाढी एकादशी वारी साजरी करण्यात आली.
या दरम्यान विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी तयार केलेल्या पालख्यांची मिरवणूक शाळेच्या परिसरात काढण्यात आली. या पालखी सोहळ्यामुळे शाळेच्या परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. विठ्ठल -रुक्मिणी नामाचा गजर करत जगदगरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या नामाचा ही गजर करत महाराष्ट्राच्या परंपरेची दर्शन सर्व विद्यार्थ्यांनी घडवून आणले. यामध्ये पालकांनी सहभाग घेऊन चिमुकल्यासह विठोबा रखुमाईच्या गजरावर ठेका धरला व लहान वारकर्यांनी आनंदाने नृत्य केले. मुक्ताईंनी ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाजलेल्या भाकर्या आणि चांगदेवांचे गर्व हरण करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी चालवलेली निर्जीव भिंत हा जिवंत देखाव्याचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. या भक्तीमय वातावरणामुळे सर्वांनी आनंद लुटला.यावेळी शाळेचे अध्यक्ष लक्ष्मण देवकर, सचिव संदीप देवकर आणि मुख्याध्यापिका प्रसिदा रविशंकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या उपक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहकार्य केले.
---------------
Related
Articles
उद्योगपती सुजित पाटकरला जामीन
16 Jul 2025
गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्यावर सरकारचा भर
17 Jul 2025
‘वक्तृत्व स्पर्धेतून टिळक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील’
12 Jul 2025
बसच्या काचा फोडल्याप्रकरणी चौघांना अटक
13 Jul 2025
त्रिशुंड गणपती मंदिर गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी खुले
11 Jul 2025
यानिक सिनरला अंतिम सामन्यात कार्लोस अल्काराझचे आव्हान
13 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अस्तित्वासाठी ‘एकत्र’?
2
पेच मिटला, संघर्ष कायम
3
‘निराधार’ शेतकरी
4
लोकशिक्षण, राष्ट्रवाद आणि पत्रकारितेवर टिळकांचे मूलगामी चिंतन
5
‘वक्तृत्व स्पर्धेतून टिळक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील’
6
भारतीय खाद्यपदार्थांचा वरचष्मा