E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
इंडोनेशिया बोट दुर्घटनेतील बेपत्ता नागरिकांचा शोध सुरूच
Wrutuja Pandharpure
05 Jul 2025
जकार्ता
: इंडोनेशियातील बाली या पर्यटन बेटावर बोट बुडाल्यानंतर बेपत्ता झालेल्या ३० जणांचा शोध अद्याप सुरूच आहे. बुधवारी रात्री उशिरा पूर्व जावामधील केतापांग बंदर सोडल्यानंतर ’केएमपी तुनु प्रतामा जया’ ही बोट बुडाली. ही बोट बालीच्या गिलिमानुक बंदराकडे जात होती.गुरुवारी संध्याकाळी दृश्यमानतेच्या समस्येमुळे शोध आणि बचाव कार्य थांबवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी पोलिस आणि सैनिकांसह १६० हून अधिक बचावकर्त्यांच्या मदतीने ते पुन्हा सुरू करण्यात आले. तीन हेलिकॉप्टर, एक ड्रोन आणि जवळपास २० जहाजांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे, असे राष्ट्रीय शोध आणि बचाव एजन्सीचे उपप्रमुख रिबुट इको सुयात्नो यांनी सांगितले.
सुयात्नो म्हणाले की, हवामान अंदाजानुसार शुक्रवारी बाली सामुद्रधुनीभोवती उंच लाटा आणि वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, त्यामुळे लहान बोटींऐवजी नौदलाची तीन जहाजे तैनात करण्यात आली आहेत.गुरुवारी रात्री उशिरा एजन्सीने सुटका केलेल्या २९ जणांची नावे जाहीर केली आणि सहा जणांच्या मृत्यूची पुष्टी केली. बेपत्ता झालेल्यांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत; परंतु प्रवाशांच्या यादीनुसार ३० लोक बेपत्ता होते.
Related
Articles
सोळा बी.एड. महाविद्यालयांची मान्यता रद्द; कारवाई नियमानुसारच
17 Jul 2025
उजनी सव्वा महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले
12 Jul 2025
घर पाडण्याचा खर्च छांगूर बाबाकडून करणार वसूल करणार
15 Jul 2025
गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता
11 Jul 2025
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरुवात
16 Jul 2025
कामगार नेत्याला दहा लाखाची खंडणी घेताना पकडले
12 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अस्तित्वासाठी ‘एकत्र’?
2
पेच मिटला, संघर्ष कायम
3
‘निराधार’ शेतकरी
4
लोकशिक्षण, राष्ट्रवाद आणि पत्रकारितेवर टिळकांचे मूलगामी चिंतन
5
‘वक्तृत्व स्पर्धेतून टिळक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील’
6
खडकवासला धरणाजवळ प्रेमीयुगलाची आत्महत्या