एमसीए, एमटेक प्रवेशासाठी अर्जप्रक्रिया सुरू   

पुणे : राज्य सीईटी सेलमार्फत मास्टर ऑफ  कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (एमसीए), हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी (एचएमसीटी) इंटिग्रेडेट अभ्यासक्रम व मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी (एमई अथवा एमटेक) या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे.
 
एमसीए, एचएमसीटी आणि एमई या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्यात आली आणि त्याचा निकालही जाहीर करण्यात आला. आता प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. त्याचे वेळापत्रक सीईटी सेलने प्रसिद्ध केले असून,   त्यानुसार अर्ज मागविण्यात येत आहे. एमसीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ९ जुलैपर्यंत आहे. अर्जाची छाननी व अर्ज निश्चिती १० जुलैपर्यंत केले जाणार आहे. १३ जुलै रोजी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती यादी प्रसिद्ध होईल. या यादीवरील काही हरकती अथवा सूचना १४ ते १६ जुलै या कालावधीत स्वीकारले जातील. त्यानंतर १८ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे.
 
दरम्यान, एमसीए अभ्यासक्रमांच्या वेळा-पत्रकानुसार एमटेक आणि एचएमसीटी या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्जाची मुदत ९ जुलैपर्यंत आहे. १३ जुलै रोजी विद्यार्थ्यांची तात्पुरती यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर १८ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे.
 

Related Articles