पुण्यात छत कोसळून एकाचा मृत्यू, तिघे जखमी   

पुणे : पुणे शहरातील लष्कर परिसरात एका इमारतीचे काम सुरू असताना छत कोसळून एकाचा मृत्यू झाला. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले. लष्कर परिसरातील साचा पीर स्ट्रीट रस्त्यावरील एका इमारतीचे दुपारच्या सुमारास छत भरण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक छत कोसळला आणि त्यामध्ये चार जण खाली पडले. घटनेमध्ये शुभंकर मंडल या कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून अन्य तीन कामगार गंभीर जखमी झाले.
 
त्या सर्वांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हे काम करताना कामगारांनी कोणत्याही प्रकारची सुरक्षा उपकरण वापरली नव्हती, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस आणि अग्निशामक दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
 

Related Articles