अत्याचारप्रकरणी दोघांना शिक्षा   

पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या दोघांना २० वर्षे सक्तमजुरी व मुलीच्या अपहरण प्रकरणात तिच्या मैत्रिणीसह दोघांना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सत्र न्यायाधीस ए. एस. वाघमारे यांनी हा निकाल दिला. 
 
अत्याचार प्रकरणात रिजवान इक्राबद्दीन अन्सारी (वय ३५, रा. उत्तमनगर) व दशरथ आत्माराम चव्हाण (वय २२, वडगाव बुद्रुक) यांना २० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी रिजवानला १३ हजार ५०० रुपये, तसेच दशरथला दहा हजार रुपये असा दंड ठोठावण्यात आला आहे. मुलीच्या अपहरण प्रकरणात मैत्रिण उज्ज्वला रविंद्र आतकरे (वय २३, सिंहगड रस्ता) आणि साजिद बुंदु अन्सारी (वय २६, रा. एरंडवणे) यांना १० वर्षे सक्तमजुरी सुनावण्यात आली आहे. आरोपी उज्वलास साडेसात हजार आणि साजिदला तीन हजार रुपये दंड ठोठाविण्यात आला आहे दंडापैकी पीडितेला २० हजार रुपये देण्यात यावेत, असे देखील न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
 
पीडित मुलीची उज्ज्वला मैत्रिण आहे. घरी जात असताना तिचा मोबाईल रस्त्यावर पडला. त्यामुळे घरातील सदस्य ओरडतील, अशी भिती मनात होती. त्यानंतर ती मैत्रिण उज्ज्वलाकडे गेली. मोबाईल दुरूस्त करुन देते, असे सांगून उज्ज्वलाने मित्र रिजवान आणि दशरथ यांना घरी बोलाविले. त्यानंतर पीडित मुलीला धमकावून दशरथने तिच्यावर बलात्कार केला. मोबाईल दुरुस्तीसाठी तळेगाव दाभाडे येथे जावे लागेल, असे त्यांनी मुलीला सांगितले. मुलीने नकार दिल्यानंतर तिला धमकाविण्यात आले. रिक्षातून आरोपी साजीद आणि रिजवान मुलीला घेऊन भूगाव येथील एका लॉजवर गेले. रिजवानने तिच्यावर अत्याचार केला. तिने विरोध केल्यानंतर रिजवानने मारहाण केली. साजीद आणि उज्ज्वलाने धमकावले, असे पीडित मुलीने फिर्यादीत म्हटले होते. या प्रकरणाचा दत्तवाडी पोलिसांनी तपास करुन सर्व आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील मारूती वाडेकर यांनी बाजू मांडली. पीडित मुलीची साक्ष या खटल्यात महत्वाची ठरली. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली.

Related Articles