E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुणेकरांनी घेतला नाट्यगीतांचा आस्वाद
Wrutuja pandharpure
30 Jun 2025
पुणे
: बालगंधर्व यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त आयोजित ’नाट्यशृंगार’ या नाट्यगीतांच्या मैफिलीचा आस्वाद पुणेकर रसिकांनी घेतला. इतर नाट्यपदांनाही रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
संगीत नाटक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणार्या बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे रविवारी भरत नाट्यमंदिरात झालेल्या या मैफलीत शृंगार रसावर आधारित नव्या आणि जुन्या संगीत नाटकांमधील रंगतदार पदांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ संगीत नाटक रंगकर्मी गायक सुरेश साखवळकर, गायिका बकुल पंडित, गायक रविंद्र कुलकर्णी, गायिका अस्मिता चिंचाळकर, गायक चिन्मय जोगळेकर, गायिका संपदा थिटे आणि गायक केदार केळकर यांनी सादर केलेल्या नाट्यपदांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
या मैफलीचा प्रारंभ केदार केळकर यांनी सादर केलेल्या ’सौभद्र’ या नाटकातील ’प्रिये पहा’ या लोकप्रिय नाट्यगीताने झाला. यानंतर त्यांनी ’सुवर्णतुला नाटकातील ’रतिहुनि सुंदर’ हे नाट्यगीत सादर केले. संपदा थिटे यांनी ’सुवर्णतुला’ या नाटकातील ’अंगणी पारिजात फुलला’ आणि ’मदनाची मंजिरी’ या नाटकातील ’ये मौसम है रंगीन’ ही नाट्यपदे सादर करून रसिकांना संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळाचे स्मरण करून दिले. चिन्मय जोगळेकर यांनी ’मत्स्यगंधा’ या नाटकातील ’नको विसरू संकेत मीलनाचा’ आणि ’मदनाची मंजिरी’ या नाटकातील ’आली प्रणय चंद्रिका करी’ ही नाट्यपदे, तर अस्मिता चिंचाळकर यांनी ’मानपमान’ या नाटकातील ’नाही मी बोलत नाथा’ आणि ’मदनाची मंजिरी’ या नाटकातील ’अंग अंग तव अनंग’ ही नाट्यपदे सादर केली.
रविंद्र कुलकर्णी यांनी सादर केलेले ’मंदारमाला’ या नाटकातील ’ओ गुलबदन’ हे वैशिष्ट्यपूर्ण नाट्यपद आणि ’स्वर सम्राज्ञी’ या नाटकातील ’टुमदार कुणाची छान’ हे नाट्यपद रसिकांची दाद घेऊन गेले. बकुल पंडित यांनी ’पाणीग्रहण’ या नाटकातील ’प्रीति सुरी दुधारी’ आणि ’मृच्छकटिक’ या नाटकातील ’माडीवरी चल ग गडे’ नाट्यगीत सादर केले.
सुरेश साखवळकर यांनी सादर केलेल्या ’देवमाणूस’ या नाटकातील ’चांद माझा हा हासरा’ आणि ’कान्होपात्रा’ या नाटकातील ’अगा वैकुंठीच्या राया’ या नाट्यगीतांनी या मैफलीचा समारोप झाला. या गायक कलाकारांना ऑर्गनवर हिमांशु जोशी, तबल्यावर केदार कुलकर्णी आणि व्हायोलीनवर प्रज्ञा देसाई - शेवड यांनी साथसंगत केली. या सुरेल मैफलीचे अनुराधा राजहंस यांनी अभ्यासपूर्ण निवेदन केले. तर नाना कुलकर्णी यांनी व्यवस्थापन केले.
Related
Articles
इराणमध्ये दहशतवादी हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू, २० जखमी
26 Jul 2025
फर्ग्युसन रस्त्यावरची बेकायदा विक्री रोखा
23 Jul 2025
रशियन विमान उतरताना अपघातग्रस्त ; सर्व ५० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती
24 Jul 2025
सरकारने विधानसभेला पत्त्याचा क्लब बनवला
24 Jul 2025
कार्यक्षेत्राबाहेरील ऊस गाळप करणांर्या साखर कारखान्याकडून तोडणी वाहतूक घ्यावी : शेट्टी
24 Jul 2025
प्रभाग रचनेत न्याय शहराला की उपनगरांना!
21 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
2
महागाईवाढ मंदावली? (अग्रलेख)
3
‘डॉन’ चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे निधन
4
बँकिंग क्षेत्राची स्थिती मजबूत
5
मंथरेच्या सल्ल्याने कैकयी दशरथावर रुसली!
6
गणेशभक्तांसाठी कोकण मार्गावर २५० एसटी बस