E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
विशाखापट्टणम येथील बंदरावर आगडोंब
Samruddhi Dhayagude
20 Nov 2023
एका बोटीमुळे २५ मासेमारी नौकांची राखरांगोळी
विशाखापट्टणम येथील बंदरात काल (१९ नोव्हेंबर) रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत २५ मासेमारी नौकांची राख झाली. आग आटोक्यात आणण्यासाठी भारतीय नौदलाचे एक जहाज आले असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन गाड्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. प्रत्येक बोटीची किंमत सुमारे १५ लाख आहे. या घटनेत अंदाजे ४ ते ५ कोटींचे नुकसान झाले.
विशाखापट्टणमचे पोलीस आयुक्त रविशंकर यांनी सांगितले की, रात्री उशिरा एका मासेमारीच्या बोटीला आग लागली. ही आग पसरू नये यासाठी बोट कापून टाकण्यात आली. पण वारा आणि पाण्याच्या प्रवाहाने ती पुन्हा जेटीवर आली. परिणामी इतर बोटीही जळू लागल्या. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बोटीत डिझेल कंटेनर आणि गॅस सिलिंडर होते. त्यामुळे आग अधिक पसरत गेली आणि संपूर्ण जेट्टीत आगीचा भडका उडाला.
एका बोटीत पार्टी सुरू होती, त्यामुळे आग लागली असावी असाही अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तर काहींच्या मते गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी बोटींना आग लावली असल्याचा संशय मच्छिमारांनी व्यक्त केलाय.
वरिष्ठ पोलीस अधिकारी आनंदा रेड्डी यांनी सांगितले की, आग रात्री साडे अकराच्या सुमारास लागली. बोटीवरील सिलिंडरमुळे स्फोट झाले, त्यामुळे आम्ही लोकांना दूर राहण्यास सांगितले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल काम करत आहेत. आगीचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही. कोणतीही जीवितहानी झाली नाही. गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे”, असेही ते म्हणाले.पोलिस आयुक्त रविशंकर यांनी या घटनेच्या तळापर्यंत जाण्यासाठी सर्वतोपरी चौकशी केली जाईल असे सांगितले.
https://twitter.com/ANI/status/1726423063733113281
Related
Articles
खडसे यांचा लवकरच पक्ष प्रवेश
15 Sep 2024
जैव अर्थव्यवस्था १५१ अब्ज डॉलर्स
14 Sep 2024
मेक्सिकोत दुर्गंधीयुक्त पाणी लोकवस्तीत नागरिकांचा जगण्यासाठी प्रचंड संघर्ष
17 Sep 2024
नवीन शिखर
16 Sep 2024
पुण्याकडे येणार्या कुटुंबातील बाळासह चौघांचा मृत्यू
15 Sep 2024
मोदी यांची भीती उरली नाही : राहुल
11 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
3
सोने झळाळणार, वाहनांची घसरण
4
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
5
वाचक लिहितात
6
वाचक लिहितात