E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
क्रीडा
विश्वचषक जिंकूनही ऑस्ट्रेलिया आयोजकांवर नाराज
Samruddhi Dhayagude
20 Nov 2023
अहमदाबाद : विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला आहे. सहा गडी राखून ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. ट्रेव्हिस हेडने भारताविरोधात खेळताना १३७ धावांची खेळी केली. यानंतर विश्वचषक ऑस्ट्रेलियाच्या संघाला देण्यात आला. मात्र ऑस्ट्रेलियातल्या प्रसार माध्यमांनी भारतावर टीका केली आहे.
भारतावर नेमकी काय टीका होत आहे?
विश्वचषक जिंकल्याने ऑस्ट्रेलियन संघाचे कौतुक होत आहे. मात्र ऑस्ट्रेलियातल्या प्रसारमाध्यमांनी भारतीय संघातल्या खेळाडू आणि प्रेक्षकांच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ऑस्ट्रेलियातल्या माध्यमांनी लिहिले आहे की, पॅट कमिन्स आणि त्याच्या टीमचा विजय त्यांना समजलाच नसेल कारण जेव्हा त्यांना विश्वचषक हाती देण्यात आला तेव्हा संपूर्ण मैदान रिकामे झाले होते.
द क्रॉनिकलने काय म्हटले?
द क्रॉनिकल या वृत्तपत्राने ऑस्ट्रेलियाच्या विजयाची बातमी दिली आहे त्यात असे म्हटले आहे की, भारतीय खेळाडू आणि प्रेक्षक यांच्यात खेळभावना दिसली नाही. ज्यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या हाती विश्वचषक दिला गेला तेव्हा भारतीय खेळाडू आतून दुखावलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे जाणवले. जेव्हा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू विश्वचषक घेऊन तो क्षण साजरा करत होते तेव्हा भारतीय खेळाडूंनी त्यांच्याकडे आणि त्या सोहळ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. याला खेळभावना म्हणतात का? असाही प्रश्न द क्रॉनिकलने विचारला आहे.
हेराल्ड सनचीही टीका
यानंतर ‘हेराल्ड सन’ने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगची प्रतिक्रिया घेतली. पॉटिंग म्हणाला जी खेळपट्टी तयार करण्यात आली होती त्याचा भारतावरच उलट परिणाम झाला. गेल्या महिन्यात खेळण्यात आलेल्या साखळी सामन्यात ज्या खेळपट्टीवर भारताने पाकिस्तानला नमवले आणि सात गडी राखून विजय मिळवला त्याच मैदानावर विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवण्यात आला. ही खेळपट्टी अपेक्षेपेक्षा कमी वेगवान होती. त्यावर अपेक्षेपेक्षा चेंडू कमी फिरला. मात्र प्रत्येक खेळाडूने खेळपट्टीशी जुळवून घेत चांगली गोलंदाजी केली.
'द एज'ने काय म्हटले?
'द एज'ने लिहिले आहे की, ९० हजारांहून अधिक भारतीय प्रेक्षक असलेल्या नरेंद्र मोदी मैदानात विराट कोहलीची विकेट गेल्यानंतर फक्त ऑस्ट्रेलियाच्या ११ खेळाडूंचाच आवाज ऐकू आला. कोहलीचा बाद करुन कमिन्सने ऑस्ट्रेलियाला विजयाच्या मार्गावर आणले आणि त्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि लॅबुशेन या दोघांनी १९२ धावांची भागिदारी केली आणि विजय खेचून आणला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर पसरलेली शांतता ही कमिन्स आणि त्याच्या संघातील खेळाडूंसाठी आनंदाची गोष्ट ठरली.
'द संडे मॉर्निंग हेराल्ड'ने लिहिले, ‘कमिन्सने विजयाबाबत बोलताना असे म्हणाला,'' हे क्रिकेटचे शिखर आहे.’ वृत्तपत्रात छापल्यानुसार, कर्णधार पॅट कमिन्सला वाटते की, भारताला हरवून ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकणे ही आपल्या संघाची सर्वांत मोठी कामगिरी आहे. या संदर्भात खासगी वृत्तवाहिनीने माहिती दिली आहे.
Related
Articles
आघाडीत काँग्रेस एकाकी (अग्रलेख)
11 Jan 2025
सुकमामध्ये चकमकीत तीन नक्षलवादी ठार
10 Jan 2025
नीरज चोप्रा सर्वोत्तम भालाफेकपटू
11 Jan 2025
पुणे-मिरज मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम मार्चपर्यंत होणार पूर्ण
06 Jan 2025
पंजाबमध्ये ‘आप’ आमदाराचा गोळी लागून मृत्यू
12 Jan 2025
तमीम इक्बालकडून निवृत्तीची घोषणा
12 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
स्वयं अध्ययनातून परिणामकारक शिक्षण
2
डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा
3
आरटीई प्रवेशांसाठी पालकांनी दलालांपासून सावध रहावे
4
‘ह्यूमन मेटान्यूमो‘ म्हणजे काय?
5
कुंभमेळा आणि सुरक्षा कवच
6
नवा संघर्ष (अग्रलेख)