पंतप्रधान केवळ अदानींसाठी काम करतात : राहुल   

बुंदी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी  पुन्हा एकदा गौतम अदानी यांच्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान मोदी हे उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी चोवीस तास काम करतात, अशा शब्दांत राहुल यांनी पंतप्रधानांवर टीका केली. पंतप्रधानांनी ’भारत माता की जय’ ऐवजी ’अदानी जी की जय’ म्हणावे. कारण, ते त्यांच्यासाठीच काम करतात, असा आरोपही त्यांनी केला. गरीब, शेतकरी आणि मजूर हीच ‘भारत माता’ आहे. जेव्हा या घटकांचा देशाच्या विकासात सहभाग होईल, तेव्हाच भारत मातेची ’जय’ होईल, असे ते म्हणाले. 
 
पंतप्रधानांना दोन ’हिंदुस्थान’ बनवायचे आहेत. एक अदानी आणि दुसरा गरिबांसाठी, असा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधान कधीही जातीनिहाय जनगणना करणार नाही, असेही राहुल म्हणाले. 

Related Articles