दिल्लीतील हवेची गुणवत्ता सुधारली; सतर्क राहणे गरजेचे   

पर्यावरण मंत्री गोपाल राय यांची माहिती   

 
नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांत दिल्लीतील हवेची गुणवत्ता सुधारली आहे. तरीही नागरिकांनी सतर्क राहणे आणि प्रदूषण नियंत्रणाच्या सर्व उपायांचे पालन करणे आवश्यक असल्याचे दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी रविवारी सांगितले. 
 
राय म्हणाले, दिवाळीपूर्वी पाऊस आणि अनुकूल हवामानामुळे जी हवेची गुणवत्ता सुधारली होती, ती नागरिकांकडून फटाके फोडल्याने त्याचा फटका बसला आहे. काही दिवसांत हवेमध्ये सुधारणा झाली असून, नागरिकांनी जागृत राहणे आणि सर्व वायुप्रदूषण नियंत्रणाच्या उपायांचे पालन करणे गरजेचे आहे.  
 
अनुकूल वातावरणामुळे रविवारी दिल्ली आणि आसपासच्या भागात हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली. सकाळी 7 वाजता शहराचा ’एअर क्वालिटी इंडेक्स’ (एक्यूआई) 290 होता. यापूर्वी गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी एक्यूआई अनुक्रमे 419, 405 आणि 319 इतका नोंदविण्यात आला आहे. शून्य आणि 50 मधील एक्यूआई चांगला, 51 आणि 100 मधील समाधानकारक, 101 आणि 200 च्या दरम्यान मध्यम, 201 आणि 300 दरम्यान खराब, 301 आणि 450 दरम्यान गंभीर मानला जातो, तर 450 च्यावरील अत्यंत गंभीर मानला जातो.
 

Related Articles