E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
नव्या युद्धामुळे चिंता
Wrutuja pandharpure
22 Jun 2025
अर्थनगरीतून,महेश देशपांडे
इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या निमित्ताने नवा आखाती संघर्ष पहायला मिळत आहे. हे युध्द जास्त काळ चालल्यास भारतावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. भारताच्या बासमती तांदळाच्या निर्यातीला फटका बसला आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या शुल्कवाढीच्या धमकीनंतरही भारतात निर्मिलेल्यापैकी ९७ टक्के आयफोनची अमेरिकेत विक्री झाल्याचे दिसून आले आहे.
इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर लगेचच परिणाम झाल्याचे दिसत नसले, तरी हा संघर्ष आणखी वाढल्यास भारताला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते, असे वरिष्ठ सरकारी अधिकार्यांनी सांगितले. या लढाईमुळे खनिज तेलाच्या किमती वाढू शकतात. शेअर बाजारातही चढ-उतार होऊ शकतो , रुपयाचे मूल्य घसरू शकते. समुद्रमार्गे माल पाठवण्याचा खर्च वाढू शकतो. यामुळे अर्थ मंत्रालय आणि इतर सरकारी संस्था बाजारपेठांवर लक्ष ठेवून आहेत. .
इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे भारतीय शेअर बाजार कोसळला. जगभरातील शेअर बाजार कोसळत असल्याने गुंतवणूकदार घाबरले होते. त्यामुळे अनेकांनी बाजारातून पैसे काढून घेतले. सेन्सेक्स आणि निफ्टी ०.७ टक्क्यांनी घसरले होते. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ०.६ टक्क्यांनी घसरून ८६.०९ रुपयांवर डॉलर गेला. पोहोचले. खनिज तेलाच्या किमती १२ टक्क्यांनी वाढून प्रति पिंप ७८.५ डॉलर्स एवढा झाल्या; पण नंतर खाली आल्या.
इस्रायल -इराण युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याची भीती आहे. हा जगातला अतिशय महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. त्यावरून जगातील सुमारे २० टक्के तेलव्यापार होतो. इराणने हा मार्ग अडवल्यास जहाजांनी वस्तू पाठवण्याचा आणि विमा मिळवण्याचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढू शकतो. याचा परिणाम भारतावरही होऊ शकतो. त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात. इतर देशांमधून भारतात येणार्या वस्तूंच्या किमतीवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पश्चिम अशियात अशांतता निर्माण झाल्यामुळे पंजाबमधील बासमती तांदळाच्या निर्यातदारांची झोप उडाली आहे. सध्या बासमती तांदूळ वाहून नेणारी अनेक जहाजे प्रवासा मध्येच आहेत. दोन्ही देशांमधील युद्ध सुरू राहिल्यास जहाजांना मधूनच परतावे लागू शकते. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल. पश्चिम आशिया हा भारताच्या बासमती तांदळाचा मोठा खरेदीदार आहे आणि पंजाब देशाच्या एकूण बासमती उत्पादनापैकी ४० टक्के उत्पादन करतो.. या युद्धामुळे निर्यात करायच्या वस्तूंचा विमा मिळवण्यातही अडचणी येत आहेत. कारण, तणावाचे वातावरण असल्यामुळे विमा कंपन्यादेखील कव्हर देण्यास नकार देत आहेत. हा विषय बासमती तांदळापुरता मर्यादित नाही. युद्ध वाढल्यास तेल आयातीतही समस्या येतील. त्यामुळे भारताचे मोठे नुकसान होईल.
कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा)नुसार, २०२२ मध्ये बासमती तांदळाच्या निर्यातीतून भारताने ४८ हजार कोटी रुपयांचे परकीय चलन कमावले. त्यात पंजाबचा वाटा किमान ४० टक्के होता. इराणवरील अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारतातून इराणला होणार्या बासमती तांदळाच्या निर्यातीवर आधीच परिणाम झाला आहे. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारताने इराणकडून तेल आयात करणे बंद केले आहे. यामुळे इराणकडे भारताला रुपयांमध्ये पैसे देण्यासाठी साठा नाही. दुसरीकडे इराणी चलनामध्ये घसरण झाल्यामुळे आयातदेखील महाग झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारताच्या एकूण बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये (३.५४ अब्ज) इराणचा वाटा सुमारे २३ टक्के (०.८१ अब्ज डॉलर) होता. २०२२ ते २०२५ दरम्यान हा वाटा बारा टक्क्यां (०.७५ अब्ज डॉलर) पर्यंत घसरला आहे.
‘अॅपल’ची विक्री वाढली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतरही या वर्षी मार्च ते मे दरम्यान भारतातून अॅपलने निर्यात केलेल्या सर्व आयफोनपैकी ९७ टक्के आयफोन अमेरिकेत पाठवले गेले. त्यांची एकूण किंमत २७ हजार सातशे कोटी रुपये आहे. केवळ मे महिन्यामध्ये भारतातून सुमारे ८,६०० कोटी रुपयांचे आयफोन अमेरिकेमध्ये निर्यात करण्यात आले. मार्चमध्ये सुमारे ११,१९५ कोटी रुपयांच्या आयफोन निर्यातीचा उच्चांक आहे. या वर्षी जानेवारी ते मे दरम्यान भारतातून अमेरिकेत ३७ हजार कोटी रुपयांचे आयफोन पाठवण्यात आले आहेत. २०२४ मध्ये सुमारे ३२ हजार कोटी रुपयांचे आयफोन निर्यात करण्यात आले होते. याचा अर्थ निर्यात पाच हजार कोटी रुपयांनी वाढली आहे. २०२४ पर्यंत अमेरिकेत विकल्या जाणार्या आयफोनपैकी केवळ पन्नास टक्के आयफोन भारतात बनवले जात होते. ट्रम्प यांनी अॅपलला २५ टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली. त्यानंतर हा आकडा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
‘अॅपल’ने भारतातून आपल्या निर्यातीची पुनर्रचना अशा प्रकारे केली आहे की, ते आता फक्त अमेरिकन बाजारपेठेतच आपली उत्पादने निर्यात करेल. यापूर्वी नेदरलँड्स, चेक रिपब्लिक आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये जास्त निर्यात केली जात होती. फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि विस्ट्रॉन हे भारतातील प्रमुख आयफोन उत्पादक आहेत. ट्रम्प यांच्या धमकीनंतर आयफोनच्या किंमतीत वाढ होऊ शकते . यामुळे अॅपलच्या विक्री आणि नफ्यावर परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही तर, अॅपल आता अॅमेझॉन, वॉलमार्ट आणि इतर प्रमुख कंपन्यांसह अमेरिकन सरकारच्या नजरेमध्ये आले आहे.
ट्रम्प ‘अॅपल’ला सतत धमकी देत आहेत की अमेरिकेत विकले जाणारे आयफोन फक्त अमेरिकेत बनवले पाहिजेत. त्यांनी हे भारतात किंवा अमेरिकेबाहेरील इतर कोणत्याही देशात उत्पादित केले, तर ते ‘अॅपल’साठी खूप महागडे ठरेल. ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर म्हटले आहे की तंत्रज्ञान कंपनीने असे न केल्यास ‘अॅपल’च्या उत्पादनांवर २५ टक्के शुल्क लावले जाईल. ट्रम्प यांच्या या धमक्यांनंतर, अमेरिकेच्या फ्युचर्स आणि जागतिक बाजारपेठेत घसरण झाली.
भारतात रोजगारनिर्मितीमध्ये सलग आठ महिने घट झाल्यानंतर, मे महिन्यात ८.९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. तथापि, वार्षिक आधारावर त्यात १.८ टक्क्यांची किंचित घट नोंदवण्यात आली. नोकर्यांशी संबंधित ‘इंडिड’ या जागतिक वेबसाइटच्या अहवालानुसार घट असूनही भारतात रोजगारनिर्मिती कोविडच्या आधीच्या काळाच्या तुलनेत सुमारे ८० टक्के जास्त राहिली. इतर प्रमुख बाजारपेठांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. आशिया -प्रशांत महासागर प्रदेशातील वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ कॅलम पिकरिंग म्हणाले की भारतात रोजगारनिर्मिती इतर देशांच्या तुलनेत वेगाने वाढत आहे, कारण देश अधिक औपचारिक धाटणीची आर्थिक व्यवस्था बनण्याकडे वाटचाल करत आहे. देश बदलत असताना औपचारिक क्षेत्रात होणारी रोजगारनिर्मिती देशभरातील एकूण रोजगारवाढीच्या तुलनेत खूपच मजबूत होईल.
.
‘इंडीड’चा हा अहवाल जागतिक नोकरी वेबसाइटच्या प्लॅटफॉर्मवर मे २०२० (जागतिक कोरोना साथीचा काळ), मे २०२४ आणि मे २०२५ च्या डेटाच्या विश्लेषणावर आधारित आहे. त्यात म्हटले आहे की प्रामुख्याने बालसंगोपन (२७ टक्के), वैयक्तिक काळजी आणि गृह आरोग्य (२५ टक्के), शिक्षण (२४ टक्के) आणि उत्पादन क्षेत्रा (२२ टक्के) मध्ये रोजगारनिर्मिती झाली. ‘जनरेटिव्ह एआय’ क्षेत्रात मे २०२५ पर्यंत रोजगारनिर्मिती १.५ टक्के होती. ती गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे.
Related
Articles
कर निरीक्षकांना मिळकत कर वसुलीचे ‘टार्गेट’
12 Jul 2025
युरोपात उष्णतेची लाट; २ हजार ३०० नागरिकांंचा मृत्यू
11 Jul 2025
विल्यम शेक्सपिअर : एक अवलिया कलावंत
12 Jul 2025
रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणार्या 96 झोपड्यांवर महापालिकेची कारवाई
17 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Jul 2025
भारताच्या महिलांचा पराभव
14 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अस्तित्वासाठी ‘एकत्र’?
2
पेच मिटला, संघर्ष कायम
3
‘निराधार’ शेतकरी
4
लोकशिक्षण, राष्ट्रवाद आणि पत्रकारितेवर टिळकांचे मूलगामी चिंतन
5
‘वक्तृत्व स्पर्धेतून टिळक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील’
6
भारतीय खाद्यपदार्थांचा वरचष्मा