E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
तहव्वूर राणाला कुटुंबीयांशी दूरध्वनीवर बोलण्यास परवानगी
Samruddhi Dhayagude
10 Jun 2025
नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याला कुटुंबीयांशी दूरध्वनीवर बोलण्याची पवानगी येथील न्यायालयाने दिली.
विशेष न्यायाधीश चंदरजीत सिंह यांनी राणा यांना फक्त एकदाच तो कुटुंबीयांशी दूरध्वनीवर बोलू शकतो, असे सांगितले. हा दूरध्वनी तुरुंग नियमावलीनुसार आणि तिहार तुरुंग अधिकार्यांच्या देखरेखीखाली असेल, असेही न्यायाधीशांनी सांगितले.
तहव्वूर याच्या प्रकृतीबाबत १० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने यावेळी दिले.
यासोबतच, न्यायालयाने तहव्वूर याला नियमित दूरध्वनी करण्याची परवानगी द्यावी की नाही, यावर तुरुंग अधिकार्यांनी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वूर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
४ एप्रिल रोजी तहव्वूर याला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले. त्याने १३ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २००८ दरम्यान पत्नी समराज राणा अख्तरसह उत्तर प्रदेशातील हापूर आणि आग्रा, दिल्ली, केरळमधील कोची, गुजरातमधील अहमदाबाद आणि महाराष्ट्रातील मुंबईला भेट दिली होती. तसेच, डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद गिलानी याच्या मदतीने हल्ल्याची आखणी केली होती.
Related
Articles
रस्त्यांवरील अडथळे उद्यापर्यंत दूर करा;अन्यथा १० कोटींचा दंड : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दहा जणांचा मृत्यू
14 Jun 2025
केदारनाथ मार्गावर पुन्हा मोठा अपघात
18 Jun 2025
नरमाई
16 Jun 2025
हिंजवडी पुन्हा एकदा जलमय
16 Jun 2025
कृषी क्षेत्रात होणार ‘एआय’चा वापर
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !