E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
लोकलमधून पडून चौघांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
10 Jun 2025
नऊ प्रवासी जखमी; आता स्वयंचलित दरवाजे बसविणार
मुंबई : ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ एका धोकादायक वळणावर गर्दीने खचाखच भरलेल्या आणि विरुद्ध दिशेने जाणार्या लोकलमधील दारात लटकलेले काही प्रवासी खाली पडले. यामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, नऊ प्रवासी जखमी झाले. सोमवारी सकाळी ही घटना घडली.
एक लोकल कसाराकडे जात होती. तर, दुसरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जात होती, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी सांगितले.सकाळची वेळ असल्याने चाकरमानी कामास निघाले होते. दोन्ही लोकल प्रवाशांनी भरलेल्या होत्या. काही प्रवासी दारामध्ये बसले होते. तर, काही बाहेर लटकत होते. दोन्ही लोकल विरुद्ध दिशेने जात होत्या. लोकलच्या दारामध्ये उभ्या राहिलेल्या प्रवाशांच्या बॅगा बाहेर लटकत होत्या. यातूनच ही दुर्घटना घडली.
जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच चौघांचा मृत्यू झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. अन्य जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने सर्व मुंबई उपनगरीय रेल्वे तसेच नवीन लोकलच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला आहे, असे रेल्वेचे अधिकारी दिलीप कुमार यांनी सांगितले. प्रवाशांची सुरक्षितता हीच रेल्वेची प्राथमिकता असून अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असेही ते म्हणाले. मुंबईत दररोज सुमारे ७५ लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात, असेही ते म्हणाले.
रेल्वे प्रशासन अपघातामागचे कारण शोधत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर, पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी पावले उचलली जात आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या घटनेवरून प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित होते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
केतन सरोज, राहुल गुप्ता, मयूर शाह आणि विक्की मुख्याद अशी मृतांची नावे आहेत. तर, शिवा गवळी, आदेश भोईर, रिहान शेख, अनिल मोरे, तुषार भगत, मनीष सरोज, मच्छिंद्र गोतारणे, स्नेहा धोंडे, प्रियांका भाटिया, अशी जखमींची नावे आहेत. गर्दीमुळे अनेक जण दारात उभे राहून प्रवास करत होते. एका वळणावर विरुद्ध दिशेने येणार्या लोकलमधील प्रवाशाचा धक्का लागल्याने अनेक जण खाली पडले, असे एका जखमी प्रवाशाने सांगितले.
Related
Articles
वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
15 Jun 2025
आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज
18 Jun 2025
श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
16 Jun 2025
अमेरिकेकडून नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्वे
13 Jun 2025
जयप्रकाशचे डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
15 Jun 2025
दुसर्यांचा जीव वाचविण्याऐवजी फोटोसाठी सुरु होती धडपड!
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !